Green Tea Side Effects esakal
लाइफस्टाइल

Green Tea Side Effects : चुकीच्या वेळी ग्रीन टी प्यायल्यामुळे आरोग्याचे होऊ शकते नुकसान, जाणून घ्या ग्रीन टी पिण्याची योग्य वेळ

वाढलेले वजन कमी करण्यासाठी लोक ग्रीन टी चा आधार घेतात. ग्रीन टी प्यायल्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते. यासोबतच रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्याचे काम ग्रीन टी करतो.

Monika Lonkar –Kumbhar

Green Tea Side Effects : निरोगी जीवनशैलीसाठी संतुलित आहार आणि नियमितपणे व्यायाम करणे, अतिशय आवश्यक आहे. मात्र, सध्याचे धकाधकीचे जीवन, फास्टफूडचे वाढलेले सेवन आणि व्यायामाचा अभाव यामुळे, आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक समस्या या वजनवाढीच्या आहेत.

मग, हे वाढलेले वजन कमी करण्यासाठी लोक ग्रीन टी चा आधार घेतात. ग्रीन टी प्यायल्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते. ग्रीन टी प्यायल्यामुळे वजन कमी होण्यासोबतच त्वचेवरील चमक देखील वाढते. यासोबतच रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्याचे काम ग्रीन टी करतो.

त्यामुळे, ग्रीन टी चे असे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. परंतु, ग्रीन टी पिण्याची देखील एक योग्य वेळ असते. जर तुम्ही चुकीच्या वेळी ग्रीन टी प्यायला तर यामुळे, आरोग्याचे नुकसान देखील होऊ शकते. आज आपण चुकीच्या वेळी ग्रीन टी प्यायल्यामुळे आरोग्याचे होणारे नुकसान आणि ग्रीन टी पिण्याची योग्य वेळ कोणती? ते जाणून घेणार आहोत.

पित्ताची समस्या उद्भवते

अनेक जण सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी ग्रीन टीचे सेवन करतात. मात्र, असे करणे साफ चुकीचे आहे. सकाळी रिकाम्या पोटी ग्रीन टी प्यायल्यामुळे पित्ताची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे, रिकाम्य पोटी ग्रीन टी पिऊ नका, त्याआधी काहीतरी खा आणि त्यानंतर १ तासाने ग्रीन टी प्या.

जेवण केल्यानंतर ग्रीन टी पिणे टाळा

काही जण जेवण केल्यानंतर लगेचच ग्रीन टी चे सेवन करतात. मात्र, असे करणे चुकीचे आहे. जेवण केल्यानंतर लगेचच ग्रीन टी पिऊ नका यामुळे, आरोग्याचे नुकसान होऊ शकते. या व्यतिरिक्त जास्त प्रमाणात ग्रीन टी चे सेवन केल्याने शरीरात लोहाची कमतरता भासण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे, जास्त प्रमाणात ग्रीन टी पिणे टाळा.

ग्रीन टी पिण्याची योग्य वेळ कोणती?

दिवसातून २ कपांपेक्षा जास्त ग्रीन टीचे सेवन करणे टाळा. या व्यतिरिक्त तुम्ही झोपण्यापूर्वी आणि जेवण केल्यानंतर लगेचच ग्रीन टी चे सेवन करणे टाळा. तुम्ही सकाळी नाश्ता केल्यानंतर १० ते ११ या वेळेत ग्रीन टी पिऊ शकता. त्यानंतर, संध्याकाळी ५-६ या वेळेत तुम्ही ग्रीन टी चे सेवन करू शकता. ग्रीन टी पिण्याची ही खर तर योग्य वेळ आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Multibagger Stock: 5 दिवसांतच 1 लाखाचे झाले 3 लाख! 300% रिटर्न देणाऱ्या शेअरने गुंतवणूकदारांना केले मालामाल

आरक्षणावरून सुरू झाला वाद अन् कॉलेजमध्ये पेटलं वातावरण! कसा आहे ‘जयंती २’? वाचा Review

Hindi Medium Engineering: इंग्रजीची अडचण दूर! आता चक्क हिंदीतून सिव्हिल इंजिनिअरिंग; विद्यार्थ्यांना मिळणार रु. २ लाखांचे अनुदान

Latest Marathi News Live Update : राज्यात दुष्काळजन्य स्थिती, राज्यात ऑगस्ट महिन्यात ४६ टक्के तूट

Ganeshotsav 2026: हरतालिका अन् गणेश चतुर्थी एकाच दिवशी का? पूजा करण्याची योग्य वेळ कोणती? | Ganesh Chaturthi 2026

SCROLL FOR NEXT