Skin Care Tips esakal
लाइफस्टाइल

Skin Care Tips : चेहऱ्यावर चमक हवी आहे? मग, पालक आहे मदतीला, बनवा 'हे' होममेड फेसपॅक

त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी हिरव्या पालेभाज्या फायदेशीर आहेत. पालेभाज्यांपासून तुम्ही फेसपॅक्स बनवू शकता. हे फेसपॅक्स तुमच्या त्वचेला चमक मिळवून देण्यास मदत करतात.

Monika Lonkar –Kumbhar

Skin Care Tips : निरोगी जीवनशैलीसाठी तुम्ही नियमित व्यायाम करणे आणि संतुलित आहार घेणे महत्वाचे आहे. या संतुलित आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या आणि फळांचा समावेश करण्यास आवर्जून सांगितले जाते.

फळे आणि हिरव्या पालेभाज्यांमुळे आपल्या शरीराला भरपूर ऊर्जा मिळते. परंतु, ही फळे आणि पालेभाज्या आपले शरीर मजबूत करण्यास मदत करतात आणि त्वचेच्या समस्या देखील दूर करतात.

फळांचा वापर करून आपण त्वचेच्या अनेक समस्या दूर करतो. फळांपासून आपण फेसपॅक देखील बनवतो. काही जण हे फेसपॅक घरच्या घरी तयार करतात. परंतु, आजकाल मार्केटमध्ये अशा प्रकारचे फेसपॅक्स मोठ्या प्रमाणात मिळतात.

तुम्ही हिरव्या पालेभाज्यांपासून देखील फेसपॅक्स बनवू शकता. हे फेसपॅक्स तुमच्या त्वचेला चमक मिळवून देण्यास मदत करतात. यात काही शंका नाही. आज आपण भाज्यांपासून बनवल्या जाणाऱ्या फेसपॅक्सबद्दल जाणून घेऊयात.

पालक

पालक ही पालेभाजी आपल्या आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी अतिशय फायदेशीर आहे. पालकचा फेसपॅक बनवताना त्यात तुम्हाला अर्ध्या केळ्याची मदत घ्यावी लागेल. पालकचा फेसपॅक बनवण्यासाठी सर्वात आधी पालकची पाने धुवून घ्या. ही पाने बारीक चिरून घ्या.

त्यानंतर, पालकच्या चिरलेल्या पानांची आणि केळाची छान पेस्ट तयार करा. आता ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. १५-२० मिनिटांनंतर चेहरा गरम पाण्याने धुवा. यामुळे, तुमच्या चेहऱ्यावर छान चमक येईल. अधिक चांगल्या परिणामांसाठी तुम्ही १५ दिवसांमधून एकदा या फेसपॅकचा वापर करू शकता.

काकडी

काकडीमध्ये भरपूर प्रमाणात पाणी असते. काकडीचे सेवन केल्याने आपले शरीर हायड्रेटेड राहण्यास मदत होते. त्यासोबतच काकडीचा चेहऱ्यावर वापर केल्याने चेहऱ्याला छान चमक येते आणि चेहरा हायड्रेटेड राहतो.

काकडीचा फेसपॅक बनवण्यासाठी सर्वात आधी १ काकडी बारीक किसून घ्या. त्यानंतर, मिक्सरला ही काकडी बारीक करून घ्या. काकडीच्या या पेस्टमध्ये गार झालेला ग्रीन टी मिसळा. आता तुमचा फेसपॅक तयार आहे. हा फेसपॅक आता चेहऱ्यावर लावा. १५-२० मिनिटांनंतर चेहरा धुवून घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Messi in Vantara: मेस्सीची माधुरी हत्तीणीसोबत भेट? पिल्लांसोबत खेळला फुटबॉल... वनतारा’ मध्ये काय घडलं?

IPL 2026 Auction : रिषभ पंतच्या संघाकडून मोठी चूक; ४ सामन्यांसाठी मोजले ८.६० कोटी; कॅमेरून ग्रीनपेक्षा 'या' खेळाडूचा झालाय फायदा

Latest Marathi News Live Update : लातुरात काँग्रेसच्या माजी महापौर आणि माजी नगरसेवकांचा भाजप प्रवेश

ठाकरे बंधू दाखवणार ताकद! युतीबाबत संजय राऊतांनी दिली मोठी माहिती, घोषणेची वेळ ठरली

VIDEO : सेवागिरी यात्रेत बैलगाडा शर्यतीचा थरार; शाहिद मुलानींच्या बैलजोडीने जिंकला 'पुसेगाव हिंदकेसरी' किताब, तब्बल 1100 बैलगाड्यांचा सहभाग

SCROLL FOR NEXT