Gudi Padwa 2024 esakal
लाइफस्टाइल

Gudi Padwa 2024 : मराठमोळी थोडीशी साधीभोळी.! गुढीपाडव्याला करा हटके साज, अभिनेत्रींच्या ‘या’ लूक्सपासून घ्या प्रेरणा

Gudi Padwa 2024 : अवघ्या २ दिवसांवर गुढीपाडव्याचा सण येऊन ठेपला आहे. त्यामुळे, बाजारात सगळीकडे सध्या गुढीपाडव्याची धामधूम पहायला मिळत आहे.

Monika Lonkar –Kumbhar

Gudi Padwa 2024 : अवघ्या २ दिवसांवर गुढीपाडव्याचा सण येऊन ठेपला आहे. त्यामुळे, बाजारात सगळीकडे सध्या गुढीपाडव्याची धामधूम पहायला मिळत आहे. गुढीसाठी लागणारे रेडिमेड कापड, रेडिमेड साड्या, साखरेच्या गाठी, विविध प्रकारची फुले इत्यादी गोष्टी खरेदी करण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाल्याचे चित्र आहे.

यंदा गुढीपाडव्याचा सण ९ एप्रिलला (मंगळवारी) साजरा केला जाणार आहे. हिंदू नववर्षाची सुरूवात ही गुढीपाडव्याच्या सणाने होते. शिवाय, हा सण महाराष्ट्रात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. खास गुढीपाडव्यानिमित्त महिला मराठमोळा साज करण्यावर भर देतात.

जर यंदा तुम्ही देखील मराठमोळा साज करणार असाल तर, हा लेख शेवटपर्यंत वाचा. कारण, आज आम्ही तुम्हाला काही अभिनेत्रींच्या लूक्सबद्दल सांगणार आहोत. त्यांच्या लूक्सपासून तुम्ही प्रेरणा घेऊन गुढीपाडव्याला मस्त मराठमोळ्य ढंगात तयार होऊ शकता.

पैठणीचा साज

गुढीपाडव्याच्या निमित्ताने कित्येक महिला नऊवारीचा साज करतात. परंतु, यंदा जर तुम्हाला नऊवारीचा साज न करता काहीतरी वेगळा आणि तितकाच सुंदर लूक करायचा असेल तर तुम्ही अभिनेत्री सोनाली कुलकर्णीसारखा मस्त मराठमोळा लूक करू शकता.

या फोटोत सोनालीने मस्त निळ्या रंगाची पैठणी नेसली असून त्यावर मराठमोळे दागिने, नक्षीदार नथ, कानातील झुमके, गोल्डन नेकलेस असा साज केला आहे. ही ज्वेलरी तिच्या पैठणीला मस्त मॅच झाली आहे. केसांचा मस्त अंबाडा आणि मिनिमल मेकअप करून तिने तिचा लूक पूर्ण केला आहे. पाडव्यासाठी तुम्ही देखील अशा प्रकारची पैठणी नेसून त्यावर असा सुंदर लूक करू शकता.

खण साडी स्वॅग

मागील ४-५ वर्षांपासून खण साडीची फॅशन चांगलीच चर्चेत आली आहे. पूर्वीच्या काळी ही खण साडी महिला नेसायच्या. आता पुन्हा त्या साड्यांना वेगळा टच दिला जात आहे. या खण साड्यांना महिला वर्गातून चांगलीच पसंती मिळताना दिसते. या प्रकारची खण साडी गुढीपाडव्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे.

अभिनेत्री प्राजक्ता माळीने या फोटोत सुंदर लाल आणि राखाडी रंगाची खण साडी नेसली आहे. या खण साडीवर तिने मॅचिंग अशी ऑक्सिडाईज्ड ज्वेलरी कॅऱी केली आहे. तुमच्याकडे जर खण साडी असेल तर तुम्ही देखील प्राजक्तासारखा लूक करू शकता.

खण साडीवर प्राजक्ताप्रमाणे तुम्ही केसांचा अंबाडा, हातात बांगड्या, कानात झुमके, गळ्यातले, नक्षीदार नथ आणि मिनिमल मेकअप करू शकता. मग, बघा तुमचा लूक कसा हटके दिसतो ते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Central Government Employees Salary : केंद्रीय कर्मचारी, निवृत्तीवेतनधारकांना दिलासा; २५ सप्टेंबरलाच वेतन-पेन्शन जमा होणार

Bank Update: रविवारीही बँका राहणार सुरू! सरकार आणि RBIचा मोठा निर्णय

Mumbai News: गणेश विसर्जनाला मोठी गर्दी होणार! मुंबईतील महत्त्वाचे रस्ते वाहतुकीसाठी बंद, मेट्रो सेवेतही बदल; वाचा सविस्तर

गणपती विसर्जन मिरवणुकीत लाठीचार्ज; दीपक वागसकर यांचा मृत्यू, कार्यकर्त्यांचा पोलिसांवर आरोप | Ahilyanagar, Bhingar

Vivo Smartphone: 10,000mAh बॅटरी आणि 1.5K AMOLED डिस्प्लेसह येतोय Vivo S2 FE 5G; पाहा दमदार फीचर्स अन् किंमत...

SCROLL FOR NEXT