Guru Purnima
Guru Purnima  sakal
लाइफस्टाइल

Guru Purnima 2023: गुरुपौर्णिमेला का घेतात दीक्षा, जाणून घ्या या दिवशी दीक्षेचे महत्त्व

Aishwarya Musale

हिंदू धर्मात, गुरु पौर्णिमा दरवर्षी आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला साजरी केली जाते. गुरुपौर्णिमेचा दिवस हा मोठा सण आणि मोठा उत्सव म्हणून साजरा केला जातो. या वर्षी गुरुपौर्णिमा हा सण सोमवार, 03 जुलै 2023 रोजी आहे.

आपल्या जीवनातून अज्ञानाचा अंधार दूर करणारा गुरु आहे. प्राचीन काळापासून गुरूने जीवनात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. समाज आणि समाज घडवण्याच्या प्रक्रियेत गुरू हा देखील अविभाज्य घटक आहे. वेद आणि पुराणात गुरूचे वर्णन देवतांच्या बरोबरीने केले आहे.

गुरु दीक्षा म्हणजे काय?

हिंदू धर्मात प्राचीन काळापासून दीक्षा घेण्याची परंपरा आहे. दीक्षा आपल्या दिशाहीन जीवनाला दिशा देते. दीक्षा ही एक प्रकारची शपथ, वचनबद्धता किंवा संकल्प आहे. हिंदू धर्मापासून शीख, जैन आणि बौद्ध धर्मापर्यंतही दीक्षा घेण्याची परंपरा आहे. शीखमध्ये याला अमृत संचार म्हणतात.

हिंदू धर्मात दीक्षा एकूण ६४ प्रकारे दिली जाते. यामध्ये समय दीक्षा, मार्ग दीक्षा, शांभवी दीक्षा, चक्र जागरण दीक्षा, विद्या दीक्षा, पूर्णाभिषेक दीक्षा, उपनयन दीक्षा, मंत्र दीक्षा, जिज्ञासू दीक्षा, कर्म सन्यास दीक्षा, पूर्ण सन्यास दीक्षा इत्यादी दीक्षांचा समावेश आहे.

गुरु दीक्षा कधी घ्यावी?

गुरुपौर्णिमेच्या दिवशी अनेकजण गुरू बनवतात आणि गुरूकडून दीक्षाही घेतात. जर तुमच्याकडे गुरू नसेल तर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार गुरुपौर्णिमेच्या महत्त्वाच्या दिवशी विद्वान गुरूकडून दीक्षा घेऊ शकता. गुरु नेहमी तुमच्या जीवनाचे मार्गदर्शन करतील आणि यामुळे तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडतील. शास्त्रात दीक्षा घेणे आणि देणे या दोन्ही गोष्टी अत्यंत पवित्र मानल्या गेल्या आहेत.

गुरु दीक्षा कशी घ्यावी?

जर तुम्ही याआधी गुरु दीक्षा घेतली असेल, तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुमच्या गुरूंनी तुमच्या कानात सांगितलेल्या गुप्त गुरु मंत्राचा जप करा. दुसरीकडे, जर तुम्ही कोणाला अध्यात्मिक गुरू बनवले नसेल किंवा कोणाकडून गुरु दीक्षा किंवा मंत्र घेतला नसेल, तर भगवान विष्णूंना आपला गुरू मानून त्यांना नमन करा आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा करा.

गुरुपौर्णिमेला दीक्षा घेण्याचा शुभ मुहूर्त

गुरुपौर्णिमेच्या दिवशी ब्रह्मयोग आणि इंद्र योग तयार होत आहेत. या शुभ योगांमध्ये तुम्ही गुरुकडून दीक्षा घेऊ शकता.

ब्रह्मयोग: रविवार 02 जुलै 03 जुलै दुपारी 07:26 ते 03:45 पर्यंत

इंद्र योग: सोमवार 03 जुलै दुपारी 03:45 ते 04 जुलै सकाळी 11.50

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT