Guru Purnima 2024 Sakal
लाइफस्टाइल

Guru Purnima 2024: गोशाळेत 23 वर्षांपासून गुरू-शिष्यांची परंपरा, श्रीक्षेत्र जांबरखेडा येथील श्रीकृष्ण गो-अभय तीर्थ गोशाळा श्रद्धास्थान

Guru Purnima 2024: हे करत करत त्यांनी नवनाथाच्या व भगवान शंकराच्या मंदिरांची स्थापना केली आहे. येथील गोशाळेत 24 वर्षांपासून गुरू- शिष्याची परंपरा आजही कायम आहे.

सकाळ वृत्तसेवा

Guru Purnima 2024: क्षेत्र जांबरखेडा (ता. वैजापूर) येथे श्रीकृष्ण गो-अभय तीर्थ गोशाळा या नावाने गोशाळा आहे. गोमातेची सेवा करण्याचे व्रत प.पू. सद्‍गुरू तातेराव बारसे महाराज यांनी अनेक वर्षांपासून हाती घेतले. हे करत करत त्यांनी नवनाथाच्या व भगवान शंकराच्या मंदिरांची स्थापना केली आहे. येथील गोशाळेत २३ वर्षांपासून गुरू- शिष्याची परंपरा आजही कायम आहे.

सर्वसामान्य लोकांच्या मनातील ज्या अंधश्रद्धा, अंधविश्वास आहे, तो दूर करण्यासाठी तातेराव बारसे महाराज हे दर गुरुवारी व रविवारी प्रवचनातून समाजप्रबोधनाचे कार्य करतात. याठिकाणी येणाऱ्या भक्तांना मार्गदर्शन करून त्यांचे दुःख निवारण्याचे कार्य करत आहेत. २३ वर्षे म्हणजे दोन तप हे गुरू-शिष्याचे कार्य त्यांच्या हातून घडत आहे, ही खऱ्या अर्थाने श्रीदत्तगुरू नवनाथ महाराज व त्यांच्या गुरूंचीच कृपा. त्यांचे जिल्ह्यातच नाही, तर महाराष्ट्रात व परदेशातही मोठ्या संख्येने गोभक्त शिष्य परिवार आहे.

संकलन प्रवीण पं. अकोलकर, हतनूर, प्रा. कैलास जाधव, शिऊर

गोभक्तांकडून कार्यक्रमाचे आयोजन

भारतीय संस्कृतीमध्ये थोर गुरू-शिष्य परंपरेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. याप्रमाणे गोशाळेत गुरुपौर्णिमेनिमित्त गोभक्त शिष्यांची अनोखी मांदियाळी बघायला मिळते. याठिकाणी गोभक्तांकडून गोमाता व गुरूंचे पूजन, महाप्रसाद तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजनही केले जाते.

प्रत्येक तालुक्यात गोसेवेसाठी रुग्णवाहिका

जिल्ह्यातील अनेक भागांत गोशाळेच्यावतीने गोमातेची निःस्वार्थ सेवा करण्यासाठी येणाऱ्या काळात प्रत्येक तालुक्यात ‘एक रुग्णवाहिका गोसेवेसाठी’ अशी सेवा सुरू करण्यात येणार असल्याची संकल्पना बारसे महाराज यांनी व्यक्त केली आहे.

गोशाळेची महिमा परराज्यातही

प.पू. बारसे महाराजांनी शेकडो अंध, दिव्यांगांच्या, अनेक माता-भगिनींच्या जीवनात सुख देऊन त्यांच्या समस्या दूर केल्या आहेत. शरीरावरील पांढऱ्या डागाला जगाच्या पाठीवर कुठेच उपचार नाही. परंतु, याठिकाणी गोमातेची दृढ विश्वासाने श्रद्धा केल्यास पांढरे डाग जातात; तसेच व्यसनाधीन माणसांना व्यसनापासून दूर केले. अशी शेकडो उदाहरणे याठिकाणी आल्यावर पाहायला मिळतात. पारिवारिक समस्यांचे निरासन करून घराघरांत आज सद्‍गुरू महाराजांमुळे सुख-शांतता नांदत असल्याचे गोभक्तांकडून बोलले जाते. त्यामुळे हजारो गोभक्त आज राज्यातच नव्हे, तर परदेशातही आहेत. याचा सार्थ अभिमान असल्याचे गोभक्तांना कळते. अंधविश्वास, अंधश्रद्धा, भूलथापा यांच्यापासून सर्वांनी दूर राहिले पाहिजे.

हातून होईल तेवढे सत्कार्य करा

कर्मकांडाच्या नादाला न जाता प्रामाणिकपणे कष्ट करून आई-वडिलांची, गोमातेची सेवा करा. कुणाही व्यक्तीविषयी मनात द्वेष, वाईट भावना ठेवू नका, हा नरदेह पुन्हा नाही. म्हणून जेवढे सत्कार्य आपल्या हातून होईल तेवढे नेहमी करत रहावे, असा उपदेश आपल्या प्रवचनाच्या माध्यमातून सद्‍गुरू महाराज नेहमी देतात. गुरुपौर्णिमेनिमित्त सद्‍गुरू महाराजांना वंदन करण्यासाठी अनेक गोभक्त याठिकाणी येतात व अनुग्रह घेऊन गुरूंचा आशीर्वाद घेतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sinhgad Road News : वादळी वाऱ्यात झाड पडल्याने ज्येष्ठ महिलेचा मृत्यू

IPL 2026 Marathi News : युवराज सिंग SRH मालकीण काव्या मारनवर नाराज; म्हणाला, अभिषेक शर्माने फ्रँचायझीसाठी ७ वर्ष घासली...

Latest Marathi News Live Update: कात्रज-कोंढवा परिसरात मुसळधार पावसाची हजेरी

मृदंगाचार्य लघाणे महाराजांच्या पत्नीनं संपवलं आयुष्य; वर्षभरापूर्वी लग्न, पतीवर अनैतिक संबंधाचे आरोप

IPL 2026 : RCB च्या गोलंदाजाने क्रिकेट बोर्डाला न्यायालयात खेचले, ९ एप्रिलला निकाल; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

SCROLL FOR NEXT