कोंडा ही एक सामान्य समस्या आहे जी सर्व वयोगटातील लोकांना त्रास देते. विशेषत: ज्यांचे केस लांब असतात त्यांना अनेकदा कोंडयाचा सामना करावा लागतो. जेव्हा वातावरणातील तापमान कमी होऊ लागते, तेव्हा ही समस्या आणखी मोठी होते, त्यामुळे स्काल्पला खूप नुकसान होते. कोंडा झाल्यामुळे डोक्याला खाज सुटते. काही लोकांना ऋतूत कोंडा होतो, तर इतरांना जवळजवळ प्रत्येक ऋतूमध्ये याचा त्रास होतो.
कोंडा का होतो?
केसांमध्ये कोंडा हा केवळ थंड हवामानामुळे होत नाही तर इतरही अनेक कारणे असू शकतात, जसे की ऑयली स्काल्प इंफेक्शन, जास्त शॅम्पू वापरणे, स्काल्पमध्ये डेड सेल्स तयार होणे, मालासेझिया नावाच्या यीस्टची जास्त वाढ, केअर स्प्रे, हेअर जेल किंवा हेअर कर्लर्स वापरणे. याशिवाय केसांना केमिकलवर आधारित रंग लावणे, जास्त ताण घेणे इ.
केसांना तेल लावल्याने कोंडा बरा होईल का?
केसांना तेल लावल्याने आराम मिळण्याऐवजी कोंड्याची समस्या वाढते, असे अनेक त्वचारोगतज्ज्ञांचे मत आहे. केसांना जास्त तेल लावल्याने मालासेझिया नावाचे यीस्ट स्काल्पमध्ये जमा होते, ज्यामुळे या यीस्टची अतिवृद्धी होते, त्यानंतर जास्त कोंडा दिसू लागतो.
कोणत्या प्रकारचे अँटी डँड्रफ शॅम्पू वापरावे?
कोंडा होण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे चुकीच्या शाम्पूचा वापर. शॅम्पू खरेदी करताना या गोष्टींची विशेष काळजी घ्या.
1. शॅम्पू खरेदी करताना त्यातील इनग्रेडिएंट वाचा. त्यात २ टक्के केटोकोनाझोल झिंक पायरिथिओन, २ टक्के सेलेनियम सल्फाइड किंवा सायक्लोपिरॉक्स असावे.
2. केस फक्त अँटी-डँड्रफ शॅम्पूने धुवू नका. तुम्ही थोडं अँटी-डँड्रफ शैम्पू घ्या, त्यात काही थेंब पाणी घाला आणि ते तेल लावल्याप्रमाणे तुमच्या स्काल्पमध्ये लावा. 10 मिनिटे सोडा आणि नंतर धुवा. त्यावर तुम्ही तुमचे नियमित शॅम्पू कंडिशनर वापरू शकता.
3. तुम्हाला ही प्रोसेस कायम ठेवावी लागेल कारण 1-2 वॉश पुरेसे नाहीत. तुम्हाला ते आठवड्यातून एकदा किंवा दोनदा सुमारे 7 ते 8 आठवडे वापरावे लागेल. इतके प्रयत्न करूनही, जर कोंडा तुमची साथ सोडत नसेल, तर तुम्हाला सोरायसिस, सेबोप्सोरायसिस इत्यादी इंफ्लेमेट्री डिसऑर्डर होऊ शकतात. अशा परिस्थितीत, तुम्ही त्वचारोगतज्ज्ञांशी संपर्क साधावा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.