hair sakal
लाइफस्टाइल

Hair Washing Mistakes: शॅम्पू करताना करू नका या चुका; नाहीतर केस गळतीला होईल सुरुवात

शॅम्पू करताना करू नका या चुका; केसांची गळती वाढेल

Aishwarya Musale

केसांमुळे चेहऱ्याचे सौंदर्य वाढते. केस निरोगी ठेवण्यासाठी धुतले जातात. आजकाल केस धुण्यासाठी बाजारात विविध प्रकारचे शॅम्पू उपलब्ध आहेत. स्कॅल्प स्वच्छ न ठेवल्यास केसांच्या वाढीवर परिणाम होतो. अगदी स्कॅल्पशी संबंधित आजारही होऊ शकतात.

केस आणि स्कॅल्प स्वच्छ करण्यासाठी शॅम्पूचा वापर केला जातो. केसांची स्थिती आणि समस्यांनुसार शॅम्पूचा वापर करावा. केस धुताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत हे तुम्हाला माहीत आहे का?

चुकीचा शॅम्पू वापरल्याने केस खराब होतात. अनेकदा आपण सर्वजण शॅम्पू करताना काही चुका करतो. आज तुम्हाला शॅम्पूशी संबंधित काही सामान्य चुका सांगणार आहेत.

शॅम्पूचा योग्य वापर

शॅम्पू लावण्याची बऱ्याच जणांना योग्य पद्धत माहिती नसते. काहीजण शॅम्पू थेट केसांना लावतात. ही पद्धत चुकीची आहे. कोमट पाण्यात शॅम्पू मिसळून ते पाणी केसांना लावावं आणि केस स्वच्छ पाण्याने धुवावेत.

लवकर केस धुणे

केस आणि स्कॅल्पवर किती वेळ शॅम्पू वापरावा हे तुम्हाला माहिती आहे का? असे घटक शैम्पूमध्ये आढळतात, जे सेबम कमी करण्यास मदत करतात. स्कॅल्प शॅम्पूने स्वच्छ केली जाते. कमीत कमी 3-5 मिनिटांसाठी शॅम्पू स्कॅल्पमध्ये अब्जॉर्ब होऊ द्या. असे केल्याने स्कॅल्प व्यवस्थित स्वच्छ होईल.

दररोज शॅम्पू नको

केसांना काही जण रोज शॅम्पू लावतात. केसांचं नॅचरल ऑईल त्यामुळे निघून जातं आणि केस ड्राय होतात. हेयर एक्सपर्ट्सच्या सल्ल्यानुसार दररोज केसांना शॅम्पू लावण्याची सवय असणाऱ्यानी रात्री झोपण्याआधी केसांना तेल लावावं.

मेडिकेट शॅम्पू वापरणे

तुम्ही तुमच्या केसांसाठी मेडिकेट शॅम्पू देखील वापरता का? तर आता हे करणे थांबवा. कोंडा, सेबोरिया यासारख्या समस्यांसाठी औषधी शॅम्पू वापरतात. त्यांच्या वापरामुळे स्कॅल्पचा कोरडेपणा कमी होतो, परंतु हे कॉस्मेटिकदृष्ट्या योग्य नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार, आणखी चौघांना अटक; मोबाईलसह महत्त्वाचे पुरावे हाती

Nashik Ration Shops : ग्रामपंचायती अन् बचत गटांची प्रतीक्षा संपणार कधी? नवीन रेशन परवान्यांसाठी नाशिककर आक्रमक

Pune News: वारज्यात महामार्गाचीच कोंडी! दीड किलोमीटर अंतर पार करण्यासाठी लागतो दीड तास; काय आहेत काेंडीची कारणे..

फक्त एका मालिकेमुळे रातोरात प्रसिद्ध झाली अभिनेत्री नंतर अचानक झाली गायब; आता ओळखणंही झालं कठीण

Latest Marathi News Update : नागपूर विमानतळावरील सुरक्षा मशिन्स पूर्ववत सुरू

SCROLL FOR NEXT