Hair  sakal
लाइफस्टाइल

Hair Care News: केस एका आठवड्यामध्ये किती वेळा धुवावेत? एक्सपर्ट काय सांगतात पाहा...

आजच्या व्यस्त जीवनशैलीत केसांची योग्य काळजी घेणं खूप अवघड आहे.

Aishwarya Musale

आपण सर्वांनी ऐकले आहे की दररोज केस धुवू नये. केस रोज धुतले तर केस कोरडे पडू शकतात. याशिवाय इतरही अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमचे केस आठवडाभर धुवू नये. प्रत्येकाने केसांचा प्रकार लक्षात घेऊन आठवड्यातून दोन ते तीन वेळा केस धुवावेत.

जे लोक जास्त दिवस केस धुत नाहीत त्यांना टाळूला खाज येण्याची समस्या तर होतेच पण केसांना इतरही नुकसान होऊ शकते. तर, आज आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टींबद्दल सांगत आहोत.

कोंड्याची समस्या

जर तुम्ही जास्त दिवस केस धुत नसाल तर तुम्हाला कोंड्याच्या समस्येला सामोरे जावे लागू शकते. केस न धुतल्यामुळे, डेड स्किन सेल्स टाळूवर जमा होऊ लागतात आणि अशा स्थितीत एक लेयर तयार होतो. यामुळे तुम्हाला कोंडा होण्याचा त्रास होतो. त्याच वेळी, एखाद्याला टाळूमध्ये खाज येण्याच्या समस्येचा सामना करावा लागू शकतो.

टाळूमध्ये तेल जमा होणे

तुमच्या हे लक्षात आले असेल की केस जास्त दिवस धुतले नाहीत तर केस तेलकट आणि चिकट दिसतात. खरं तर, टाळूवर तेल जमा होण्यास सुरुवात होते. जेव्हा तुम्ही तुमचे केस जास्त दिवस धुत नाही, तेव्हा तेल जमा होऊ शकतात, ज्यामुळे तुमचे केस आणि टाळू तेलकट आणि घाणेरडे दिसतात.

जास्त खाज सुटणे

जे लोक जास्त दिवस केस धुत नाहीत त्यांना टाळूला वारंवार खाज येण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. असे होते कारण डोक्यावर तेल, घाम जमा होऊ लागते, ज्यामुळे तुम्हाला टाळूला खाज येण्याची तक्रार होऊ शकते.

दुर्गंध

जर तुम्ही तुमचे केस जास्त दिवस धुत नसाल तर केसांना विचित्र वास येऊ लागतो. असे घडते कारण केस न धुतल्यामुळे तुमच्या टाळूवर तेल आणि घाम जमा होऊ लागते. ज्यातून नंतर एक विचित्र वास येतो. जर तुम्हाला खूप घाम येत असेल तर थोड्याच वेळात तुम्हाला वास येऊ लागतो.

केस गळणे

केसांची मजबूती आणि चमक टिकवून ठेवण्यासाठी त्यांची योग्य काळजी घेणं खूप गरजेचं आहे. पण जेव्हा तुम्ही तुमचे केस जास्त दिवस धुत नाही, तेव्हा तुमच्या केसांवर आणि टाळूच्या आरोग्यावर त्याचा नकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे केस मुळापासून कमकुवत होऊ लागतात आणि केस गळण्याची समस्या सुरू होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT