Hair Care Tips esakal
लाइफस्टाइल

Hair Care Tips : केसांसाठी फायदेशीर आहे हेअर स्पा, घरीच कसा करायचा ते जाणून घ्या!

केसांवर आपण मेहंदी, डाय, हायलाईट असे अनेक प्रयोग करत असतो

सकाळ डिजिटल टीम

Hair Care Tips :   उन्हाळ्यात केसांची अधिक काळजी घ्यावी लागते. कडक उन्हात केस मोकळे सोडले तर जास्त रूक्ष होतात. आणि केस बांधले तर घामाने चिपचिपीत होतात. त्यामुळे केसामधला जीव निघून जातो.

केसांवर कितीही शाम्पू, कंडिशनर वापरले तरी केस तात्पुरते मऊ होतात. पण, त्यांना नॅचरली ठिक करणं शक्य नसतं. त्यामुळेच, केसांवर हेअर स्पा करण्याचा सल्ला कोल्हापुरातील ब्युटिशियन मनिषा घाटगे देतात.

मनिषा सांगतात की, केसांवर आपण मेहंदी, डाय, हायलाईट असे अनेक प्रयोग करत असतो. त्यामुळे केसांना नैसर्गिक गोष्टींचे पोषण मिळत नाही. हे पोषण तुमच्या केसांना हेअर स्पा देऊ शकते. (Hair Care Tips)

केसांच्या वाढीला उपयुक्त ठरणारे प्रोटीन्स आणि व्हिटॅमिन्स हेअर स्पामधून मिळतात. त्यामुळे, केसांतून कोंडा दूर होतो, केसांची वाढ व्हायला लागते. तसेच, रूक्ष आणि निर्जिव केस मऊ,मुलायम होतात. त्यामुळेच, महिन्यातून एकदा हेअर स्पा करण्याचा सल्ला ब्युटिशियन मनिषा देतात. 

हेअर स्पा करण्याचे फायदे काय आहेत?

  • केसांची मूळे मजबूत करते

  • स्प्लिट एंड्स कमी करते

  • केसांना मऊ-मुलायम बनवते

  • केसांच्या वाढीला चालना देते

  • केसांना मसाज मिळतो त्यामुळे तणावातून मुक्तता होते

  • स्पा केल्याने टाळूमध्ये रक्ताभिसरण क्रिया जलद होते

काही दिवसांच्या अंतराने हेअर स्पा केल्याने केसांना चांगला फायदा होतो. पण, सतत हेअर स्पा करण्यासाठी पार्लरला जाणे खर्चिक आणि वेळखाऊ ठरू शकते. त्यामुळे, तुम्ही घरीच हेअर स्पा करू शकता.

पहिली स्टेप - केसांना कोमट तेलाने मसाज करा.

बदाम, तीळ आणि खोबरेल तेल मिक्स करा. त्यामध्ये व्हिटॅमिन इच्या कॅप्सूल मिसळा. हे तेल कोमट करून डोक्याला हळूवारपणे मसाज करा. यामध्ये रोझमेरी तेलही तुम्ह वापरू शकता. ज्याचे अनेक फायदे केसांना होतात.

स्टेप दोन – स्टीम घ्या

यानंतर तुम्ही स्टीमरसह घरी आरामदायी सलून स्टीम अनुभव मिळवा. घरी स्टीमर नसेल तर तुम्ही गरम पाण्याचा टॉवेल तुमच्या डोक्याभोवती गुंडाळू शकता. ज्याने केसांना उत्तमरित्या स्टीम मिळेल.  

स्टेप तीन – हेअर मास्क वापरा

केसांना तेलाने मसाज केल्यानंतर तुम्ही हेअर मास्क वापरू शकता. तुम्ही लॉरिअलची हेअर स्पा क्रीम वापरू शकता. किंवा हेअर स्पासाठी असलेले किटही तुम्ही वापरू शकता. मास्क तुमच्या केसांमधून पसरवण्यासाठी रुंद-दात असलेला कंगवा वापरा. यानंतर १५ ते २० मिनिटांनी केस धुवून घ्या. केस मशिन शिवाय सुकवा कारण, हेअर ड्रायर केसांना डॅमेज करू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray Vs BJP : ‘’भाजप 'त्या' थर्ड क्लास दर्जाच्या लोकांना बडतर्फ करणार का? की...’’; आदित्य ठाकरेंचा सवाल!

जय शाहांनंतर आणखी एक भारतीय ICC मध्ये! नवे CEO झालेले संजोग गुप्ता आहेत तरी कोण?

Latest Maharashtra News Updates : मोतीलाल नगर वसाहतीचा पुनर्विकास करताना म्हाडाला बांधकाम करून मिळणार

Mumbai Politics: शिंदेसेनेचा राजकीय गाफीलपणा, चालकांचा जीव धोक्यात; पलावा पूल प्रकरण तापलं

Pune News : न्यायालयाने काय बांगड्या घातल्या आहेत का? म्हणत न्यायालयाचा अवमान

SCROLL FOR NEXT