Hair Care Tips google
लाइफस्टाइल

Hair Care Tips : जाहीरातीत पाहिलेले लोण्यासारखे केस खरच होतील?; हे कॉफी मास्क करतील मदत!

केसांच्या अनेक समस्यांवर कॉफी उपयोगी आहे.

नमिता धुरी

मुंबई : अनेकांच्या दिवसाची सुरूवात कॉफी पिल्यावरच होते. एखाद्या दिवशी कॉफी घेतली नाही तर त्यांना फ्रेश वाटत नाही. चहा नको म्हणून कॉफी घेतली जाते कॉफीचे अनेक उपयोग आहेत. कॉफी चेहऱ्याला आणि तूमच्या केसांना मास्क म्हणून वापरता येते. केसांच्या अनेक समस्यांवर कॉफी उपयोगी आहे.

कॉफी तुमची त्वचा आणि केसांची रचना सुधारते. केसांच्या मुळांच्या वाढीस मदत करते. केसांना निरोगी बनवते. केस गळतीपासून मुक्त होण्यासही मदत करते. जर तुम्हीही काही घरगुती हेअर पॅक शोधत असाल. तर कॉफी पासून बनवलेले मास्क तूमच्या केसांसाठी जादूचे काम करतील.

कॉफी आणि व्हिटॅमिन ई

या मास्कसाठी तूम्हाला 1 टीस्पून कॉफी पावडर आणि व्हिटॅमिन ई चे 2 कॅप्सूल लागतील. एका भांड्यात कॉफी आणि कॅप्सुल घेऊन ते मिश्रण एकजीव करा. हा तयार पॅक केसांवर लावा. 30 मिनिटांनी कोमट पाण्याने केस धुवून टाका.

कॉफी खोबरेल तेल

खोबरेल तेल केसांसाठी सर्वोत्तम उत्पादनांपैकी एक आहे. हे केसांच्या वाढीस चालना देते. खोबरेल तेल एक नॅचरल हेअर कंडिशनर आहे. जे केसांना पोषण देते. हा मास्क बनवायला तूम्हाला 1 टीस्पून कॉफी पावडर आणि 1 टीस्पून नारळ तेल घ्यायचे आहे. हे मिश्रण केसांच्या मुळांना आणि केसांना लावा. रात्रभर ठेऊन नंतर ते धूवुन टाका.

कॉफी आणि दही

दही हे केसांसाठी नॅचरल कंडिशनर आहे. जे केसांचा पोत सुधारण्याचे काम करतता. केसांना मऊ आणि रेशमी बनवण्यासाठी दही चांगला ऑप्शन आहे. यासाठी तूम्हाला 1 कप ताजे दही आणि 1 टीस्पून कॉफी पावडर एकत्र करायची आहे. या मिश्रणात लिंबाच्या रसाचे काही थेंब टाका. हे तयार मिश्रण केसांच्या मुळांवर आणि शेंड्यांवर लावा. तासाभराने केस नीट धुवून टाका.

कॉफी आणि मध

केसांमध्ये जीव आणण्यासाठी आणि त्यांची वाढ व्हावी यासाठी हा पॅक बेस्ट आहे. मध हे केसातील कोंड्यासाठी आणि केसांची आर्द्रता टिकवून ठेवण्यासाठी बेस्ट आहे. या मास्कसाठी 1 टीस्पून कॉफी पावडर आणि 1 चमचे मध यांचे मिश्रण बनवा. ही पेस्ट टाळूवर आणि केसांवर लावा आणि १५ ते २० मिनिटे तशीच राहू द्या.त्यानंतर केसांना शॅम्पू आणि कंडिशनर लावा.

कॉफी आणि एरंडेल तेल

एरंडेल तेल त्याच्या फायदेशीर गुणधर्मांमुळे केसांसाठी ते बेस्ट मानले जाते. 1 टीस्पून एरंडेल तेल आणि 1 टीस्पून कॉफी पावडर मिक्स करून घ्या. हे मिश्रण लावण्यापूर्वी केस ओले करून घ्या. हे मिश्रण केसांच्या मुळाशी आणि मोकळ्या केसांना लावा. तासाभराने केस धुवून टाका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT