Hair Care Tips esakal
लाइफस्टाइल

Hair Conditioner : केस धुण्यापूर्वी अर्धा तास केसांना लावा या 3 गोष्टी, महागडं कंडिशनरही पडेल फेल

हे कंडिशनर दही, मोहरीचे तेल आणि लिंबाचा रस यांसारख्या स्वयंपाकघरातील घटकांच्या मदतीने तयार केले जाऊ शकते.

साक्षी राऊत

Hair Care Tips : हवामानातील बदलांमुळे केस गळण्याची समस्या अनेकांना जाणवते. या समस्येवर मात करण्यासाठी बरेच लोक महागडे शॅम्पू, हेअर मास्क किंवा ट्रिटमेंट घेतात. परंतु या सर्वांत केमिकलचा वापर सर्वाधिक केला जातो, त्यामुळे तुमचे केस डॅमेज होऊ शकतात. तेव्हा आज आपण घरीच हेअर कंडिशनर बनवण्याची सोपी पद्धत जाणून घेऊया. हे कंडिशनर दही, मोहरीचे तेल आणि लिंबाचा रस यांसारख्या स्वयंपाकघरातील घटकांच्या मदतीने तयार केले जाऊ शकते.

या तिन्ही गोष्टी अनेक गुणधर्मांनी परिपूर्ण आहेत जे तुमच्या केसांना खोल पोषण देतात, ज्यामुळे तुमचे केस मजबूत, मुलायम आणि चमकदार होतात, चला तर मग जाणून घेऊया घरगुती केसांचे कंडिशनर कसे बनवायचे ते.

हेअर कंडिशन घरी बनवण्यासाठी लागणारे साहित्य

होममेड हेअर कंडीशनर

दही

मोहरीचे तेल- दोन चमचे

लिंबाचा अर्धा चमचा रस

होममेड हेअर कंडिशनर घरी कसे बनवाल?

होममेड हेअर कंडिशनर बनवण्यासाठी सर्वप्रथम एक बाउल घ्या.

मग त्यात दही, दोन चमचे मोहरीचे तेल आणि दीड चमचा लिंबाचा रस घाला.

यानंतर, या तीन गोष्टी चांगल्या प्रकारे फेटून मऊ क्रीमी पेस्ट बनवा.

आता तुमचे होममेड हेअर कंडिशनर तयार आहे.

होममेड केस कंडिशनर कसे वापरावे?

घरी बनवलेले हेअर कंडिशनर लावण्यापूर्वी केसांना कंगवा फिरवत केस सुटे करा.

नंतर तयार केलेली पेस्ट केसांच्या मुळापासून लांबीपर्यंत चांगली लावा.

यानंतर, केस चांगले बांधा किंवा झाकून ठेवा.

त्यानंतर ही पेस्ट केसांवर किमान अर्धा तास राहू द्या.

यानंतर केस प्रथम पाण्याने आणि नंतर माइल्ड शॅम्पूच्या मदतीने धुवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar: चाकणकरांसाठी मोठी बातमी! वाहतूक कोंडी, खड्डे अन् अतिक्रमणांवर प्रशासनाची धडक कारवाई, उपमुख्यमंत्री पवार यांचे निर्देश

Mhaisal Canal Accident : कवठेमहांकाळमध्ये दुर्दैवी घटना! म्हैसाळ योजनेच्या कालव्यात कार कोसळून तरुण गेला वाहून; रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम सुरू

Tukaram Mundhe : कामातचं नाही सोशल मीडियावरही तुकाराम मुंढेंचा जलवा; देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, विश्वास नांगरे- पाटलांना टाकलं मागे

Marathi News Live Updates : २०२७च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकान्याची मागणी, राज्यस्तरीय मोर्चासह देशव्यापी आंदोलनाची तयारी

Nipani Tavandi Ghat Case : राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटाजवळ दगडाने ठेचून गडहिंग्लज साखर कारखान्यातील कर्मचाऱ्याचा खून; महमदवर धारदार शस्रानेही हल्ला

SCROLL FOR NEXT