ghee sakal
लाइफस्टाइल

Hair Fall: देशी तुपात या दोन गोष्टी मिसळून खा, केस गळण्याची समस्या होईल दूर

बदलत्या जीवनशैलीमुळे केस गळणे ही सामान्य समस्या बनली आहे.

Aishwarya Musale

बदलत्या जीवनशैलीमुळे केस गळणे ही सामान्य समस्या बनली आहे. केस गळणे, तुटणे यामुळे केवळ मुलीच नाही तर मुलेही त्रस्त असतात. अनेकजण यासाठी महागडे उपचार करतात पण त्यांची समस्या तशीच असते. अशा परिस्थितीत आयुर्वेद हा अत्यंत प्रभावी उपाय ठरू शकतो. आयुर्वेदात केस गळण्याची एक नाही तर अनेक कारणे सांगितली आहेत.

आयुर्वेदानुसार अनुवांशिक समस्या, जास्त मीठ, साखर, मिरची, मसालेदार गोष्टी खाणे, खराब जीवनशैली, तणाव, निद्रानाश, धूळ किंवा प्रदूषण ही केस गळतीची कारणे आहेत. आयुर्वेदिक मार्गानेही त्यावर नियंत्रण ठेवता येते. जर तुम्ही केस गळण्याच्या समस्येशी लढत असाल तर देशी तूप मिसळून दोन गोष्टी खाल्ल्यास महिन्याभरात केस गळतीवर नियंत्रण मिळवता येते.

देशी तूपात मिसळून या गोष्टी खा

जर तुम्ही केसगळतीमुळे त्रस्त असाल आणि त्यावर उपाय शोधत असाल तर घरगुती उपायांचा अवलंब करणे फायदेशीर ठरू शकते. आवळा आणि खडी साखर आयुर्वेदात खूप फायदेशीर असल्याचे वर्णन केले आहे. अर्धा चमचा देशी तुपात आवळा पावडर आणि खडी साखर समान प्रमाणात मिसळून दिवसातून दोनदा रिकाम्या पोटी चघळल्याने केस गळण्याची समस्या दूर होते.

केस गळणे थांबवण्यासाठी काय खावे

केसांची वाढ आणि त्यांचे आरोग्य यांचा थेट संबंध पोषणाशी आहे. सकस आणि संतुलित आहार घेतल्यास केसांना आवश्यक पोषण मिळते. जेव्हा केसांना आवश्यक जीवनसत्त्वे ते प्रथिनांपर्यंत सर्व पौष्टिक घटक मिळतात, तेव्हा त्यांचे तुटणे कमी होते. त्यामुळे आहारात मूग डाळ, आवळा, काकडी, ताक, बदाम, अक्रोड, शेंगदाणे, तीळ, खोबरे, त्रिफळा, मेथी, डाळिंब, बडीशेप, पालेभाज्या आणि भाज्या व अंडी यांचा समावेश करावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT