Hair Care Tips natural shampoo  
लाइफस्टाइल

कमी वेळात जास्त केस वाढविण्यासाठी घरीच बनवा हे तीन शैम्पू

धनाजी सुर्वे

कोल्हापूर - महिलांच्या साैंदर्यात त्यांच्या काळ्याशार केसांचे महत्व जास्त असेत. या केसांची काळजी घेणे आणि ते सांबसडक होण्यासाठी महिला अनेक उपाय करत असतात. आज आम्ही तुम्हाला असे तीन शैम्पुंची कमाल सांगणार आहोत की ज्यामुळे तुमचे केस खूप कमी वेळात लांबसडक तर होतीलच पण केस गळतीही थांबेल. विशेष म्हणजे हे तिन्ही शैम्पू तुम्हाला घरी बनवता येणार आहेत. 

 अंड्याचा शैम्पू
अंडे केसांची गुणवत्ता, केसांचा पोत आणि केसांचे आरोग्य सुभारणाचे प्रभावी काम करते. शिवाय आपल्या केसांची वाढ सुधारण्यास आणि केस गळतीस प्रतिबंधित करते.

साहित्य
एक-दोन अंडे 
 एक छोटा चमचा बेसन
 लैव्हेंडर तेल - काही थेंब
 फिल्टर केलेले पाणी - १/4 कप
 केसांचे तेल - 1 चमच्या (कोरड्या केसांसाठी)
 
शैम्पू बनविण्याची पद्धत 
वरील सर्व वस्तू ब्लेंडर जारमध्ये घ्या. जर तुमचे केसे कोरडे असतील तर त्यामध्ये एक चमचा केसांचे तेल मिसळा. 
 गुळगुळीत शैम्पूसारखी सुसंगतता मिळविण्यासाठी हे सर्व व्यवस्थित बारीक करा.  ओल्या केसांना शैम्पू लावा आणि मालिश करा. याला 2-3-. मिनिटे ठेवा आणि थंड पाण्याने धुवा. त्यानंतर एखादा चांगला कंडीशनर वापरा.
 
  
ग्रीन टी शैम्पू
ग्रीन टीमध्ये असे काही गुण असतात की ते तुमच्या केसांची गळती थांबवते आणि केसांना हेल्दी ठेवून त्याची वाढ करते. आपल्या केसांची निगा राखण्यासाठी घरगुती शैम्पू म्हणून ग्रीन टीचा वापर करा. 
 
साहित्य
ग्रीन टी - 1/4 कप
कॅस्टिल साबण - १/4 कप
 
 शैम्पू बनविणे आणि वापरण्याची पद्धत
एका पंप बाटलीमध्ये हे सर्व मिसळा आणि नियमित शैम्पू म्हणून वापरा. मिश्रण ओल्या टाळूवर काही मिनिटे मालिश करा आणि नंतर ते स्वच्छ करा. त्यानंतर एखादा चांगला कंडीशनर वापरा.

  
कोरफड ग्रीन टी शैम्पू

ग्रीन टी  केसांना हायड्रेट्स आणि पोषण देते. शिवाय एक शक्तिशाली अँटीऑक्सिडेंट आहे जे केसांना मजबूत बनवते आणि केस गळण्यास प्रतिबंध करते.  


साहित्य 
एक दोन कप कोरफड 
एक ते चार कप ग्रान टी 
 
 शैम्पू बनविणे आणि वापरण्याची पद्धत
कोरफडची पाने स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर कोरफडांची पाने सोलून त्याचे जेल काढा. ते जेल ब्लेंडर जारमध्ये एकत्र करा. आता 3-4 चहाच्या पिशव्यांसह एक कप ग्रीन टी बनवा. ब्लेंडर जारमध्ये एक ते चार कप ग्रान टी टाका आणि कोरपडीचे जेल ग्रीन टीसोबत चांगले मिक्स होईपर्यंत ब्लेंड करा. ओलसर केसांवर 2-3 चमचे शैम्पूने मालिश करा आणि स्वच्छ धुवा. त्यानंतर एखादा चांगला कंडीशनर वापरा.
 
  
सूचना
जेव्हा तुम्ही नैसर्गिक शैम्पू वापरता तेव्हा केसांना नवीन पद्धतीमध्ये मोड करण्यासाठी वेळ लागतो. त्यामुळे हे शैम्पू वापरल्यानंतर केसांचा कोरडेपणा, कोमलता किंवा केस गळणे देखील अनुभवू शकता. परंतु, एकदा का तुमच्या केसांना नैसर्गिक शैंम्पूची सवय लागेल त्यावेळी तुचे केस वेगाणे वाढतील. महत्वाची गोष्ट म्हणजे या शैंम्पूचे कोणहे दुष्परिणाम होत नाहीत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Adityanath Mobile Number: अधिकारी काम करत नाहीत? CM योगींकडे करा थेट तक्रार! मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा मोबाईल नंबर

Harbhajan Singh : रोहित शर्माला ODI कर्णधारपदावरून हटवल्याने हरभजन सिंग खवळला, शुभमन गिलबाबत म्हणाला...

Marathi Movie : तरूणाईला प्रेमाचा जादुई अनुभव देणारं ‘ये ना पुन्हा’ गाणं प्रदर्शित!

Ajit Agarkar: रोहित शर्मासाठी परतीचा प्रवास सुरू? कर्णधारपदावरून दूर करण्याची माहिती दिली होती,आगरकर

Kolhapur Bhishi Scam : विश्वासू मित्र म्हणून भिशी भरायला दिली, अन् ४० महिलांना पती, पत्नीने २५ लाखांना गंडवलं...; कोल्हापुरातील घटना

SCROLL FOR NEXT