Healthy Hair:  Sakal
लाइफस्टाइल

Healthy Hair: शॅम्पू केल्यानंतर केसांना दुर्गंधी येत असेल तर 'या' गोष्टींचा करा वापर

Healthy Hair Tips: तुमच्याही केसांना शॅम्पू केल्यानंतर केसांना दुर्गंधी येत असेल तर घरगुती गोष्टींचा वापर करू शकता.

Puja Bonkile

Healthy Hair: पावसाळा अनेकांचा आवडता ऋतू आहे. पण या ऋतूमध्ये त्वचेसह केसासंबंधित समस्या देखील निर्माण होतात. या दिवसांमध्ये केस देखील खुप गळतात. यामुळे केसांची योग्य काळजी घेणे गरजेचे असते. अनेकांच्या केसांमध्ये शॅम्पू केल्यानंतरही दुर्गंधी येऊ शकते. ही समस्या दूर करण्यसाठी पुढील घरगुती गोष्टींचा वापर करू शकता.

लिंबाचा रस

जर तुमच्या केसांमधून शॅम्पू केल्यानंतर देखील वास येत असेल तर लिंबाच्या रसाचा वापर करू शकता. यासाठी पाण्यात २-३ लिंबाचे थेंब पाण्यात मिक्स करावे. केस धुतल्यानंतर या पाण्याने केस धुवावे. लिंबूमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात जे केसांमधला दुर्गंध दूर करतात.

टी ट्री ऑइल

केसांना शॅम्पू केल्यानंतर देखील वास येत असेल तर टी ट्री ऑइलचा वापर करू शकता. टी ट्री ऑइलचे काही थेंब शॅम्पूमध्ये मिक्स करावे आणि केस धुवावे. तेलामध्ये जंतुनाशक गुणधर्म असतात,जे टाळूला निरोगी ठेवण्यास मदत करतात. यासोबतच केसांचा वास कमी करण्यास मदत करते.

आलं आणि पुदिना

पावसाळ्यात केसांची योग्य काळजी घेतल्यास केस गळत नाही. तुम्ही आलं आणि पुदिना रस वापरून केसांच्या मुळात लावू शकता. नंतर केस स्वच्छ पाण्याने धुवावे. यामुळे केसांचा वासही दूर होईल.

गुलाबपाणी

त्वचेसोबतच केसांसाठीही गुलाबजल खूप फायदेशीर आहे. यासाठी केस धुतल्यानंतर केसांवर गुलाबजलचा स्प्रे करावा. यामुळे केसांमधुन दुर्गंधी येणार नाही.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

Ghodegaon News : घोडेगावच्या पाणी साठवण तलावात बुडून तीन मुले ठार; दहा वर्षिय रिहान शेख बचावला

Team India Schedule: भारताच्या वेळापत्रकात आणखी एक दौरा... वैभव सूर्यवंशीला या संघात नक्की जागा मिळणार

Pune News : पुणे महापालिकेच्या तिजोरीत ५ हजार ३२६ कोटी; मिळकतकरातून २,९८५ कोटी, तर बांधकाम करातून २,३४१ कोटी

SCROLL FOR NEXT