hair care sakal
लाइफस्टाइल

Hair Care Tips : केस गळून गळून टक्कल पडेल असं वाटतंय? हे घरगुती हेअर मास्क ठरतील फायदेशीर, लवकरच दिसेल फरक

केस गळून गळून टक्कल पडेल असं वाटतंय? हे घरगुती हेअर मास्क ठरतील फायदेशीर...

सकाळ डिजिटल टीम

काळे आणि लांबसडक केस असावेत, अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. मग त्यासाठी सुरू होते लगबग. मार्केटमधले प्रोडक्ट्स, घरगुती उपाय, डॉक्टरांचे सल्ले आणि मित्रमैत्रिणींचं ऐकून एक नाही अनेक उपाय केले जातात. पण काळ्या, लांबसडक केसांचं स्वप्न असंच पूर्ण होत नाही. त्यासाठीही तुम्हाला मेहनत घ्यावी लागते, केसांची काळजी घ्यावी लागते.

आता तुम्ही म्हणाल, आम्ही केसांना तेल लावून मालीश करतो. पण तरीही केस अफाट गळतात. तसेच, केस गळण्यासोबतच केसांत कोंडा, केसांना फाटे फुटणं यांसारख्या समस्याही उद्भवतात. मग अशावेळी काय कराल? तर अशावेळी केसांना योग्य वेळी योग्य पोषक तत्व पुरवणं आवश्यक असतं. केसांचं आरोग्य उत्तम राखण्यासाठी घरगुती उपाय फायदेशीर ठरतात.

केस निरोगी ठेवण्यासाठी हेअर मास्क

खोबरेल तेल आणि मध

जर केस कोरडे आणि खराब झाले असतील तर 2 टेबलस्पून खोबरेल तेलात 1 टेबलस्पून मध मिसळा आणि 30 मिनिटे केसांवर राहू द्या. नंतर शॅम्पू करा.

दही आणि मध

हे सर्व प्रकारच्या केसांसाठी योग्य आहे. हे करण्यासाठी 1 कप दह्यात 2 चमचे मध मिसळा आणि ओल्या केसांना लावा. 20-30 मिनिटे तसेच ठेवा, नंतर केस धुवा.

एलोवेरा आणि ऑलिव्ह ऑइल

तेलकट केस असल्यास हे लावा. यासाठी 2 टेबलस्पून एलोवेरा जेल 1 टेबलस्पून ऑलिव्ह ऑइलमध्ये मिसळून केसांना लावा. 30 मिनिटांनंतर, ते शॅम्पूने चांगले धुवा.

मेथी आणि दही

केस पातळ असल्यास 2 चमचे मेथी दाणे रात्रभर भिजत ठेवा आणि पेस्ट बनवा. आता त्यात १/२ कप दही घालून अर्धा तास केसांवर राहू द्या. नंतर ते शॅम्पूने चांगले धुवा.

Mumbai Water Supply: मुंबईत २२ ते २६ डिसेंबरपर्यंत पाणी संकट! 'या' भागांसाठी बीएमसीकडून महत्त्वाचा इशारा जारी, वाचा यादी...

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस जीवन घोगरे पाटील यांचे अपहरण आणि सुटका

Upcoming IPO : 2026 मध्ये IPO ची लाट! पैसे तयार ठेवा; रिलायन्स जिओ, PhonePe ते Flipkart या 10 मोठ्या IPO वर बाजाराची नजर

Pachora Nagar Panchayat : पाचोरा पालिकेत शिवसेनेचा भगवा; २८ पैकी २२ जागांवर गुलाल, वाघ गटाला मोठा धक्का

Pune House Burglary : कुलूप तोडून सोनं-रोकड चोरी; कात्रज-मांजरीत दोन घरफोडीच्या घटना!

SCROLL FOR NEXT