hair sakal
लाइफस्टाइल

Hair care Tips: तुमचेही केस धुतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तेलकट होतात का? लगेचच वापरून पाहा या ट्रिक्स

धूळ आणि प्रदूषणामुळे केसांची काळजी घेणं खूपच त्रासदायक होतं.

Aishwarya Musale

धूळ आणि प्रदूषणामुळे केसांची काळजी घेणं खूपच त्रासदायक होतं. महिला असो वा पुरूष दोघांनाही सध्या केसगळती, केस लवकर पांढरे होणे, केसांमध्ये कोंडा होणे यासारख्या समस्यांना सतत सामोरे जावे लागते. अशा वेळी केसांमधील घाण आणि तेल काढून टाकण्यासाठी शँपूचा वापर केला जातो.

केस स्वच्छ करण्यासाठी आणि ते ताजे दिसण्यासाठी आपण शॅम्पूचा वापर करतो. पण दररोज शॅम्पू केल्याने स्काल्पचे तेल उत्पादन आणखी वाढते. त्यामुळे काही छोट्या टिप्सचा अवलंब करणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून केस तेलकट आणि चिकट होण्याची समस्या लवकर आटोक्यात आणता येईल. तर आज आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स सांगत आहोत-

शॅम्पूकडे लक्ष द्या

जर तुमचे केस वारंवार तेलकट होत असतील तर तुम्ही तुमच्या शॅम्पूकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. केसांचा प्रकार लक्षात घेऊन सल्फेट फ्री शॅम्पू वापरण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही केमिकल बेस्ड हार्श शॅम्पू वापरत असाल तर ते तुमच्या टाळूतील नैसर्गिक तेल काढून टाकू शकतात, ज्यामुळे टाळूमध्ये आणखी तेल उत्पादन होते.

तसेच, अधूनमधून अतिरिक्त तेल आणि उत्पादन जमा होण्यासाठी क्लेरिफाइंग देणारा शॅम्पू वापरा. क्लेरिफाइंग शॅम्पूचा अतिवापर करू नका, कारण ते तुमच्या केसांना नैसर्गिक तेल देखील काढून टाकू शकतात.

गरम पाणी

जर तुमचे केस खूप लवकर तेलकट होत असतील तर तुम्ही तुमच्या केसांची काळजी घेण्याची पद्धत देखील बदलली पाहिजे. उदाहरणार्थ, केस धुताना कधीही गरम पाण्याचा वापर करू नका. त्याऐवजी कोमट किंवा थंड पाणी वापरा. गरम पाणी टाळूतील नैसर्गिक तेल काढून टाकू शकते, ज्यामुळे तुमची टाळू अधिक तेल तयार करू शकते.

संतुलित आहार घ्या

आहारामुळे केवळ आरोग्याची काळजी घेतली जात नाही, तर त्याचा परिणाम त्वचा आणि केसांवरही होतो. त्यामुळे केसांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी संतुलित आहार घ्यावा. व्हिटॅमिन ए आणि ओमेगा -3 फॅटी ऍसिडसह तुम्हाला तुमच्या आहारातून आवश्यक पोषक घटक मिळत असल्याची खात्री करा.

हेयर प्रोडक्ट्सचा वापर कमी करा

ज्या लोकांचे केस लवकर तेलकट होतात, त्यांनी हेअर स्टाइलिंगचा वापर कमी करणे महत्त्वाचे आहे. सीरम, हेअर जेल आणि हेअरस्प्रे यांसारख्या स्टाइलिंग उत्पादनांचा जास्त वापर केल्याने टाळूमध्ये तेल जमा होऊ शकते. त्यामुळे केस ग्रीसी आणि चिकट वाटतात.

केसांना सतत हात लावू नका

काही लोकांना केसांना वारंवार स्पर्श करण्याची सवय असते. असे करणे चांगले मानले जात नाही. विशेषत: तुमचे केस लवकर तेलकट होत असतील तर तुम्ही तुमची ही सवय बदलली पाहिजे. दिवसभर तुमच्या केसांना स्पर्श केल्याने तुमच्या हातातून तुमच्या केसांमध्ये तेल हस्तांतरित होऊ शकते, ज्यामुळे ते अधिक चिकट दिसू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: 'होर्मुझ'मधून जहाजांची वाहतूक सुरु होण्याचा मार्ग मोकळा; इराणने दिली माहिती, सामंजस्य कराराचा मसुदा तयार

SRH vs RR Eliminator IPL 2026: वैभव सूर्यवंशीसाठी 'क्रिकेट देवा'चे खास ट्विट... क्रिकेट दिग्गजांकडूनही कौतुक! RR चा धावांचा डोंगर

Latest Marathi News Live Update : राजकारणापासून ते गुन्हेगारीपर्यंत देशात आज काय-काय घडलं? एका क्लिकवर जाणून घ्या प्रत्येक अपडेट

Mumbai-Goa Highway : झाडं लावली की फक्त कागदावरच दाखवली? मुंबई-गोवा महामार्गावरील 'त्या' 1 लाख 96 हजार वृक्षांचं नक्की काय झालं? प्रशासनाचा नवा प्लॅन काय?

Crime: भयंकर! ४८७ हून अधिक पुरुषांसोबत शरीरसंबंधासाठी दबाव, सिगारेटचे चटके, मारहाण अन्... प्रियकराचं प्रेयसीसोबत पाशवी कृत्य

SCROLL FOR NEXT