Hair Care esakal
लाइफस्टाइल

Hair Care : अकाली झालेले पांढरे केस काळे करायचेत? ट्राय करा सोप्या टिप्स

सतत डाय केल्यानं केसांचा पोत खराब होतो.अनेकदा पार्लरच्या महागड्या ट्रिटमेंट्स घेऊनही हवेतसे केस मिळत नाहीत.

सकाळ डिजिटल टीम

Home Remedies for White Hair : सध्या खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि दूषित पाण्यामुळे लोकांचे केस लहान वयातच पांढरे होत आहेत. या समस्येला तोंड देण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करतात. सतत डाय केल्यानं केसांचा पोत खराब होतो.अनेकदा पार्लरच्या महागड्या ट्रिटमेंट्स घेऊनही हवेतसे केस मिळत नाहीत.

आज आम्ही तुम्हाला अशी आयुर्वेदिक पद्धत सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही तुमचे केस पांढरे होण्यापासून थांबवू शकता. केस धुताना वापरण्याच्या शॅम्पूमध्ये तुम्ही हर्ब्स वॉटर घालू शकता जेणेकरून तुमची केस पांढरे होण्याची समस्या दूर होण्यास मदत होईल.

आयुर्वेदिक पाणी

साहित्य

  • 2 टीस्पून चहाची पावडर

  • 2 टीस्पून मेथी दाणे

  • 2 टीस्पून आवळा पावडर

कृती

यासाठी एका भांड्यात अर्धा लिटर पाणी घेऊन ते गॅसवर गरम करण्यासाठी ठेवा. आता या पाण्यात सर्व वस्तू टाका. हे पाणी अर्धे होईपर्यंत मंद आचेवर शिजवा. पाणी शिजल्यानंतर गॅस बंद करा आणि हे पाणी थंड होण्यासाठी ठेवा. ते थंड झाल्यावर गाळून घ्या आणि काचेच्या किंवा प्लास्टिकच्या बाटलीत भरून फ्रीजमध्ये ठेवा.

केस धुताना थेट केसांना शॅम्पू लावू नका. एका भांड्यात काढा. आता त्यात अर्धा कप हे पाणी घाला आणि नंतर शॅम्पू करा. आठवड्यातून 2-3 वेळा केस शॅम्पू करताना हे पाणी वापरा. यामुळे तुमचे केस पांढऱ्याचे काळे होऊ लागतील.

कढीपत्ता तेल

याशिवाय तु्म्ही पांढरे केस काळे करण्यासाठी एक कप तेलात एक कप कढीपत्ता उकळवा, तेल काळे होईपर्यंत. यानंतर हे तेल थंड करून गाळून साठवा. त्यानंतर आठवड्यातून 2-3 वेळा केसांमध्ये मसाज करा आणि रात्रभर केसांवर राहू द्या. कढीपत्त्यात व्हिटॅमिन बी भरपूर असते. हे केसांच्या छिद्रांमध्ये रंगद्रव्य मेलामाइन पुनर्संचयित करण्यात मदत करते आणि केस पांढरे होण्यास प्रतिबंध करते.

कांद्याचा रस

दोन ते तीन चमचे कांद्याच्या रसात लिंबू घाला आणि एक चमचा ऑलिव्ह ऑईल मिसळा. तुमच्या टाळू आणि केसांना मसाज करा. तासाभरानंतर केस चांगले धुवा. कांद्याच्या रसामध्ये केस लवकर वाढवण्याचे गुणधर्म असतात, तसेच केस पांढरे होण्यापासूनही बचाव करतात. लिंबाच्या रसामुळे केसांना चमक तर येतेच शिवाय केसांना चांगला बाउन्सही येतो. हे एन्झाईम्स आणि कॅटालेझ देखील वाढवते, ज्यामुळे केसांचा रंग वाढतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT