लाइफस्टाइल

Hair Care: केस विंचरण्यासाठी प्लास्टिक नाही लाकडी कंगवा वापरा, होतील जबरदस्त फायदे

लाकडी कंगवा वापरायचे फायदे माहीत आहेत का?

Aishwarya Musale

केस विंचरण्यासाठी कंगवा हे महत्वाचे साधन आहे. कंगवा ही आपल्या आयुष्यात लागणारी सर्वात उपयुक्त गोष्ट आहे. केस विंचरण्यासाठी, केसांचे आरोग्य राखण्यासाठी, केसांतील गुंता सोडवण्यासाठी अशा विविध कारणांसाठी आपण रोज कंगव्याचा वापर करत असतो.

बदलत्या ऋतूंमध्ये केस गळणे ही एक सामान्य गोष्ट आहे. या कारणास्तव, लोक आणि विशेषत: महिला विविध प्रकारचे हेयर ट्रीटमेंट  करून त्यांच्या केसांची काळजी घेतात.

या ट्रीटमेंटचा तुमच्या केसांवर चांगला परिणाम होईलच असे नाही. अनेक वेळा ते केसांना इजा करतात. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला अशाच एका गोष्टीबद्दल सांगणार आहोत, ज्याचा वापर करून तुमच्या केसांच्या अनेक समस्या कमी होऊ शकतात.

खरं तर, प्रत्येकजण आपले केस वाढवण्यासाठी कंगवा वापरतो. लोक लक्ष देत नाहीत पण कंगव्याच्या क्वालिटीचा तुमच्या केसांवर खोलवर परिणाम होतो. अशा परिस्थितीत, तज्ञ अनेकदा लाकडी कंगवा वापरण्याची शिफारस करतात. होय, केस विंचरण्यासाठी लाकडी कंगवा सर्वोत्तम मानला जातो. यामध्ये अनेक प्रकारचे गुणधर्म आढळतात, जे केसांशी संबंधित सर्व समस्या दूर करतात.

केसांचा गुंता निघून जाईल

प्लॅस्टिकच्या कंगव्याने केसांचा गुंता तर दूर होतो, पण केस पुन्हा फ्रिजी होतात, त्यानंतर केस गळायला लागतात. अशा परिस्थितीत जर तुम्ही लाकडी कंगवा वापरलात तर केस विंचरण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही आणि केस गळणार नाहीत.

ब्लड सर्कुलेशन चांगले होईल

लाकडी कंगवा हा नैसर्गिक लाकडापासून बनलेला असल्यामुळे लाकडी कंगवा जास्त टोकदार नसतो. ज्यामुळे लाकडी कंगव्याने केस विंचरल्यामुळे आपल्या स्कॅल्पवर जखमा होत नाहीत.याउलट लाकडामुळे तुमच्या केसांच्या मुळांखालील रक्ताभिसरण योग्य पद्धतीने होते.

संसर्गाचा धोका कमी होतो

लाकडी कंगव्यामध्ये अनेक नैसर्गिक अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, ज्यामुळे डोक्याला संसर्ग होण्याचा धोका कमी होतो.

केसांची वाढ होण्यास मदत होते

तेल लावल्यावर केस लाकडी कंगव्याने विंचरल्यामुळे केसांच्या मुळांना मालिश होते. ज्यामुळे केसांच्या वाढीवर चांगला परिणाम होतो. केसांची घनता आणि लांबी यामुळे वाढू लागते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kagal Traffic Relief Project : पुणे -बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर अडीच किमीचा पिलर फ्लायओव्हर, कागल लक्ष्मी टेकडीचे ट्राफिक कायमचे होणार कमी

Numerology : 'या' 3 मुलांकाच्या लोकांना नसतो सरकारी नोकरीचा योग; तयारीत घालवतात अनेक वर्षे, पण खाजगी क्षेत्रात मिळतं मोठं यश

Bihar CM: राजकारणात मोठी घडामोड! बिहारचे नवे मुख्यमंत्री कोण? निर्णय आता शिवराज चौहान यांच्या हाती, भाजपचा गेमचेंजर प्लॅन तयार

Ambadas Danve News: रक्ताने माखलेला शर्ट, दानवेंनी वाचवला एका व्यक्तीचा जीव...

IPL 2026, LSG vs GT: प्रसिद्ध कृष्णाचा तिखट माऱ्याने लखनौची फलंदाजी गडबडली; गिलच्या गुजरातसमोर सोपं लक्ष्य

SCROLL FOR NEXT