hair dandruff problem for women use acrod for routine solve this problem 
लाइफस्टाइल

घरीच तयार करा आक्रोड हेअर मास्क; अशा आहेत टिप्स

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : अक्रोडमध्ये अनेक प्रकारचे पोषक तत्व असतात. जे फक्त आपल्या आरोग्यासाठीच नाही तर त्वचा आणि केसांसाठीही लाभदायक असतात. असेच  पोषकतत्व असलेल्या अक्रोडचा वापर आहारामध्ये केल्यास ते लाभदायक ठरू शकते. यापासून तुम्ही हेअर मास्कही तयार करू शकता. जो तुमच्या केसांच्या समस्या दूर करू शकतो. अक्रोडमध्ये काही घरगुती उपायांच्या सहाय्याने हेअर मास्क तयार करता येतो. त्यामुळे केसांची समस्या दूर होण्यास मदत होते. तसेच केसातील कोंडा या मोठ्या समस्येपासून सुटकारा मिळतो. चला तर मग जाणून घेऊया केसांची सुंदरता वाढविण्यास अक्रोड कशी मदत करतो.

साहित्य -

  • आक्रोड -10 -12 
  • दही - 1 कप 
  • लिंबूरस -1 चमचा 
  • गुलाब जल -1 चमचा 

फेसमास्क बनवण्याची पद्धत
कृती -

अक्रोडचा हेअर मास हेअर मास्क बनवण्यासाठी सुरुवातीला अक्रोड एका तासासाठी पाण्यात भिजत घाला. यानंतर अक्रोडला पिसून त्याची पावडर बनवून घ्या. एका बाउलमध्ये दही घाला आणि योग्य प्रकारे ते मिक्स करून त्याची पेस्ट तयार करून घ्या. आणि यात लिंबूचा रस किंवा गुलाब जल घालुन तयार होणारी पेस्ट  तुम्ही केसांसाठी हेअर मास म्हणून वापरू शकता.

वापरण्याची पद्धत

केसांवरती या हेअर माक्सचा वापर केल्यानंतर केसांना तेल लावणे टाळा. केसांना योग्यप्रकारे शाम्पू करून सुकी करुन घ्या. केसांना दोन भागांमध्ये व्यवस्थित विभाजित करा आणि ते सुटे, खूले करून घ्या. हेअर मास्क केसांना लावताना योग्य पद्धतीने लावा. केसांना शॉवरच्या टोपीने पॅक करा. तीस मिनिटापर्यंत हा मास्क केसांमध्ये राहू द्या. यानंतर ते स्वच्छ धुऊन घ्या. केस धुताना शाम्पूचा वापर करू नका. केस सुकल्यानंतर त्यामध्ये अक्रोडच्या तेलाने मसाज करा. दुसऱ्या दिवशी केसांना शाम्पूने धुवा. या मास्कचा वापर दर आठवड्याला करा. यामुळे तुमच्या केसातील डॅंडरफची समस्या एका महिन्यात कमी होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी! , सरकारने 'त्या' महिलांना योजनेचा लाभ देणे केले बंद

Shubman Gill Video: इंग्लंडच्या गोलंदाजाने केला गिलचा फोकस हलवण्याचा प्रयत्न; मग भारताच्या कर्णधारानं काय केलं पाहाच...

Shiv Yog 2025: उद्या शिवयोगाचा दुर्मिळ योग, धनु राशीसह 5 राशींवर माता लक्ष्मीची राहील कृपादृष्टी

BPSC Clerk Recruitment: 12वी पास तरुणांसाठी सुवर्णसंधी! BPSC मार्फत क्लार्क पदासाठी भरती जाहीर; जाणून घ्या पगार किती मिळेल?

निलेश साबळे 'चला हवा येऊ द्या २' मध्ये का दिसणार नाही? खरं कारण समोर, म्हणाला, 'गेले सहा महिने...

SCROLL FOR NEXT