Home Remedies Sakal
लाइफस्टाइल

Home Remedies: तुमचेही केस रोज गळत असेल तर करा 'हे' घरगुती उपाय, काही दिवसाच दिसेल रिझल्ट

Home Remedies :तुम्ही गरगुती उपाय करून रोज केस गळण्याच्या समस्येपासून सुटका मिळवू शकता.

Puja Bonkile

use onion fenugreek seeds for daily hair fall problem

प्रत्येकाला आपले केस सुंदर, घनदाट, लांब हवे असतात. परंतु केस गळणे आणि कोरडेपणाची समस्या अनेक लोकांमध्ये दिसून येते. यापासून सुटका मिळवण्यासाठी महिला बाजारात मिळणारे नवीन तेल आणि शॅम्पू वापरतात.

परंतु अनेक वेळा ब्रँडेड प्रोडक्ट वापरून देखील त्यांची ही समस्या कमी होत नाही. पण स्वयंपाकघरातील कांदा आणि मेथी दाणा या दोन पदार्थांचा वापर करून केस गळतीची समस्या कमी करू शकता. यांचा वापर कसा करावा हे जाणून घेऊया.

  • कांद्याचा रस

जर तुमचे केसही रोज गळत असतील तर तुम्ही घरगुती उपाय करू शकता. कांद्याचा रस तुमच्या केसांसाठी रामबाण उपाय ठरू शकतो. यामध्ये अँटीऑक्सिडंट, अँटी-इंफ्लेमेटरी सारखे गुणधर्म असतात. यामुळे केस गळणे थांबते. तसेच केसांची झपाट्याने वाढ होते. याशिवाय केसांमधील कोंडा कमी होतो.

  • कसा करावा वापर

कांद्याचा रस बनवण्यासाठी सर्वात पहिले कांदा मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावा. नंतर एका सुती कापड्याच्या मदतीने त्याचा रस काढा आणि केसांच्या मुळात लावावा. नंतर 10 ते 20 मिनिटे राहू द्या. नंतर केस शॅम्पूने स्वच्छ धुवावे. कांद्याचा रस केस गळणे कमी करण्यास मदत करतो. परंतु काही लोकांना अॅलर्जी किंवा इतर समस्या असू शकतात. यामुळे कांद्याचा रस लावल्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

मेथी दाणा

मेथी दाणा आरोग्यासह केसांसाठीही फायदेशीर असते. मेथी दाण्यामध्ये तज्ज्ञाच्या मते मेथी दाण्यामध्ये कार्बोहायड्रेट, फायबर, प्रथिने, मॅग्नेशिअम, लोह यासारखे घटक असते. यामुळे केस गळण्याची समस्या कमी होते. तसेच केस मुलायम होऊन झपाट्याने वाढतात.

कसा वापर कराल

मेथी दाणा रात्री पाण्यात भिजत ठेवावे. तुमच्या केसांची वाढ लक्षात घेऊन मेथी दाणा आणि पाणी घ्यावे. दुसऱ्या दिवशी सकाळी मेथी दाण्याचे पाणी केसांना लावावे. 10 ते 20 मिनिटानंतर केस शॅम्पूने स्वच्छ धुवावे. आठवड्यातून असे दोनदा करावे. यामुळे केस गळतीची समस्या कमी होते.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पत्रव्यवहार करूनही सुरक्षा व्यवस्था नव्हती!नागपूरमधील स्फोटानंतर बारूद कामगार संघटना आक्रमक, कंपनीवर गंभीर आरोप

Tejas Express Delay: ऐन होळीच्या सणात रेल्वेचा 'शिमगा'! तेजस एक्सप्रेस ७ तास उशिरा सुटणार, प्रवाशांचे प्रचंड हाल

इस्रायल-इराण युद्धामुळे दुबईत अडकले भारतीय, मदतीसाठी टोल फ्री नंबर जारी; नाव नोंदणी करण्याचं आवाहन

Video : ईश्वरीचा जीव धोक्यात पाहून अखेर अर्णवने दिली प्रेमाची कबुली; प्रोमो पाहून प्रेक्षक खुश

UP Holi Tradition: या गावात होळीला का खेळला जात नाही रंग? भगवान श्रीकृष्ण आणि भक्त प्रल्हादाशी आहे थेट संबंध, हे आहे भावुक कारण

SCROLL FOR NEXT