Hair Fall Treatment  esakal
लाइफस्टाइल

Hair Fall Treatment :केस गळती काही केल्या थांबेना; मेथी-कडीपत्त्याचा फॉर्म्युला वापरून तर पहा!

मेथी आणि कडीपत्त्याचे तेल करेल Hair Fall कमी

Pooja Karande-Kadam

Hair Fall Treatment : गरम होतंय म्हणून केस मोकळे ठेऊन झोपलोत. की सकाळी उठल्यावर उशीवर सगळीकडे केस पडलेले असतात. केस गळण्याची समस्या सगळ्यांनाच होत असते. केसांचे तुटणे, ते रूक्ष, कमकुवत होणे ही तर आता सामान्य बाब आहे. त्यासाठी अनेक औषधेही उपलब्ध आहेत. पण, त्याने फरक पडत नाही.

केस गळणे ही अनेकांची समस्या आहे. वाढते वय, मानसिक ताण, हार्मोन्सचे असंतुलन, पोषक तत्वांची कमतरता, हवेतील प्रदूषण, आणि इतर शारीरिक आजार ही केस गळतीची काही मुख्य कारणे आहेत.

केस गळण्याचे प्रमाण जास्त असते किंवा केस गळण्याच्या प्रमाणात नवीन केस येत नाहीत, तेंव्हा ती एक समस्या होऊन बसते. अशा केस गळतीची परिणती बहुतेक वेळा टक्कल पडण्यामध्ये होते, ज्याला अँड्रोजेनेटिक अलोपेशिया  असेही म्हणतात.

गळणारे केस सौंदर्‍यात बाधा आणू लागतात, केस गळणे, पातळ होणे, टक्कल पडणे आशा कारणांमुळे अनेकांचा आत्मविश्वास कमी होतो आणि मग केस गळण्याच्या समस्येवर कोणते  घरगुती उपाय करता येतील तसेच कुठल्या औषधोपचारांनी केस गळणे थांबवता येईल याची माहिती घेऊयात.

आयुर्वेदीक तेल

एक कप मोहरीचे तेल घेऊन ते गरम करावे. तेल गरम झाल्यावर त्यात दोन ते तीन चमचे मेथीदाणे आणि कढीपत्ता घाला. साधारण दहा मिनिटे शिजवा आणि नंतर गॅस बंद करा. ते थंड झाल्यावर गाळून बाटलीत भरून ठेवा. आता रात्रभर केसांना लावा. यामुळे तुमच्या केसांची वाढ वाढेल.

केसांसाठी हेअरपॅक

मेथी आणि कढीपत्त्याचा हेअरपॅक बनवण्यासाठी प्रथम एक चमचा मेथीच्या बियांची पावडर बनवा. आता त्यात फक्त एक चमचा कढीपत्त्याची पेस्ट घाला. गरजेनुसार पातळ आणि घट्ट करा. अर्ध्या तासाने केसांना लावा आणि साध्या पाण्याने धुवा. त्याचा परिणाम लवकरच दिसून येईल.

मेथी अनेक आजारांवर गुणकारी आहे

इतर उपाय

कांद्याचा रस लावा

कांद्याचा रस लावल्याने केस गळणे कमी होते. कांद्यामुळे खूप वास येतो, परंतु कांदा बारीक करून त्यातून निघणारा रस लावल्यास केस गळणे लवकर कमी होते.

 

नारळाचे दूध

नारळाचे दूध काढणे थोडे कठीण असते पण ते केसांसाठी खूप चांगले असते. ओले नारळ किसून घ्या आणि नंतर दूध पिळून मुळांना लावा. यामुळे केसांची वाढ चांगली होते.

 

बदामाचे तेल

बदामाचे तेल केसांसाठी उत्तम मानले जाते. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही बदाम खाऊ शकता, त्याचाही खूप फायदा होईल. बदामाचे तेल लावल्याने केस गळणे थांबेल.

याचे फायदे काय आहेत

  • केसांची वाढ होते

  • केस गळती कमी होते

  • उन्हाळ्यात कोंड्यामुळे होणारी खाज कमी होते

  • केस मऊ होतात

  • केसांची आद्रता टिकून राहते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT