Tips For Hairs Like Deepika esakal
लाइफस्टाइल

Hair Growth : दीपिका सारखे सिल्की सिल्की केस हवेत? फार काही नाही ट्राय करा हा एकमेव पदार्थ...

यामुळे केसांचा पूर्ण विकास होतो आणि केसांच्या वाढीसाठीही हे खूप फायदेशीर आहे

Lina Joshi

Tips For Hairs Like Deepika: केसांच्या चांगल्या वाढीसाठी, त्यांना पुरेसे पोषण मिळणे आवश्यक आहे. कढीपत्त्यात असे अनेक पोषक तत्व असतात जे केसांसाठी खूप फायदेशीर असतात.

त्यात व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन बी, प्रथिने इत्यादी पुरेशा प्रमाणात आढळतात, ज्यामुळे केसांच्या पुनरुत्पादनात सहज मदत होते आणि स्कॅल्पचे रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे केस निरोगी राहण्यास मदत होते.

यामुळे केसांचा पूर्ण विकास होतो आणि केसांच्या वाढीसाठीही हे खूप फायदेशीर आहे. चला तर मग जाणून घेऊया केस निरोगी ठेवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी तुम्ही याचा कसा वापर करु शकता.

१. हेअर टॉनिक :

स्टाईल क्रेझनुसार केस मजबूत करण्यासाठी एका पॅनमध्ये ३ ते ४ चमचे खोबरेल तेल टाका आणि त्यात मूठभर कढीपत्ता घाला. पाने काळी होईपर्यंत गरम करा. आता गॅस बंद करुन थंड होऊ द्या. आता ते मॅश करून केसांच्या मुळांना लावा. १ तासानंतर केस शॅम्पूने धुवा.

२. हेअर मास्क:

मूठभर कढीपत्ता एक ते दोन चमचे दह्यामध्ये मिसळून पेस्ट बनवा. तुम्ही तुमच्या केसांनुसार त्याचे प्रमाण वाढवू किंवा कमी करु शकता. आता ही पेस्ट केसांना चांगली लावा आणि स्काल्पवरही लावा. अर्ध्या तासानंतर केस चांगले धुवा. आठवड्यातून दोनदा लावल्यास केस मऊ आणि निरोगी होतील.

३. आहारात समाविष्ट करा:

याचा आहारात समावेश केल्यामुळे अधिक निरोगी आणि मजबूत केस होतील. यासाठी तुम्ही त्याची पावडर सुद्धा भात किंवा आमटीमध्ये वापरु शकता. तुम्हाला हवे असल्यास ताक, चटणी इत्यादीमध्ये टाकून तुम्ही त्याचा आहारात समावेश करु शकता. तुम्ही कढीपत्ता इतर अनेक प्रकारे वापरु शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहलीवर पाच कोटींचा आरोप करणाऱ्या फलाहारी महाराजांनी मागितली माफी, म्हणाले...

Mumbai Protest Faceoff : "काय करायचं ते करा!"; शिवाजी पार्कवर पोलिसांनी अडवताच अमित ठाकरे भडकले, पोलिसांनी घेतलं ताब्यात

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : मेषसह या राशींना व्यवसायात यश; काहींना अचानक धनलाभाची शक्यता

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT