Hair Growth Tips esakal
लाइफस्टाइल

Hair Growth Tips : वातावरण बदलाने केस होतात जास्तच Damage; हे हेअरमास्क वापरून तर पहा!

हेअर मास्क तयार करण्यासाठी साहित्य लागते?

Pooja Karande-Kadam

Hair Growth Tips : जर तुमचे केस वाढत नसतील आणि त्यासाठी तुम्ही अनेक टिप्स ट्राय केल्या असतील. तरीही तुमचे केस वाढत नाहीत म्हणून आज आम्ही तुमच्यासाठी मेहंदी आणि चहापानाचा हेअर मास्क घेऊन आलो आहोत.

हा हेअर मास्क तुमच्या केसांच्या वेगवान वाढीसाठी उपयुक्त आहे. मेंदी केस मऊ आणि चमकदार करण्यास मदत करते. त्याचबरोबर चहाची पाने केस दाट आणि लांब करण्यास मदत करतात. तर जर तुम्ही आठवड्यातून एकदा हा मास्क ट्राय केली तर तुमचे केस झपाट्याने वाढू लागतात.

आता उन्हाळा संपला असून पावसाला जोरदार सुरूवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आपल्या केसांचे आरोग्य जपण्यासाठी आठवड्यातून दोनदा केवळ १० मिनिटांचा वेळ काढा आणि केसांची योग्य ती देखभाल करावी. होय, केसांची काळजी घेण्यासाठी केवळ १० मिनिटे पुरेसे आहेत.

बदलत्या वातावरणात केस शॅम्पूनं धुण्यापूर्वीही कित्येक जण बराच विचार करतात. कारण केस धुण्यासाठी पाणी अती थंड अन् अती कडक चालत नाही. पण पावसाळ्यात थोडी थंड वातावरण असते. त्यामुळे काही लोक गरम पाण्याने केस धुणे टाळतात कारण यामुळे केसांचे प्रचंड नुकसान होतं.

पण वेळोवेळी शॅम्पूनं केस धुणे गरजेचं असतं. दरम्यान हवामानात बदल होईल. त्यानुसार आपल्या केसांची देखभाल करण्यासाठी आपल्या हेअर केअर रुटीनमध्ये बदल करणं आवश्यक आहे. यासाठी काही खास हेअर मास्कचा तुम्ही वापर करू शकता. त्यात मेहंदी आणि ऍव्होकाडोचा मास्क फायदेशीर ठरेल.

हेअर मास्क तयार करण्यासाठी साहित्य-

  • ३-४ चमचे मेंदी

  • २ चमचे चहाच्या पानाचे पाणी

  • १ अंडे

मेहंदी आणि चहाच्या पानांचा हेअर मास्क बनवण्यासाठी आधी एक वाटी घ्या.

मग त्यात मेंदी, चहाच्या पानाचे पाणी आणि अंड्याचा पिवळा भाग घाला.

यानंतर तुम्ही या सर्व गोष्टी व्यवस्थित मिसळता.

नंतर त्यात थोडे खोबरेल तेल घालून मिक्स करावे.

आता तुझा मेहंदी आणि चहापानाचा हेअर मास्क तयार आहे.

मेंदी आणि चहाच्या पानाचा हेअर मास्क कसा लावावा

मेहंदी आणि चहाच्या पानांचा हेअर मास्क घ्या आणि केसांमध्ये चांगल्या प्रकारे लावा.

नंतर सुमारे 30 मिनिटे केसांमध्ये ठेवा.

यानंतर पाणी आणि शॅम्पूच्या साहाय्याने केस चांगले मिक्स करावेत.

ऍव्होकाडो हेअर मास्क

कोरडे, कमकुवत, निर्जीव केसांवर उपाय म्हणून तुम्ही अ‍ॅव्होकाडो तेलाचा वापर करू शकता. यामुळे केसांची वाढ होण्यास मदत मिळते. अ‍ॅव्होकाडोच्या तेलामध्ये व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन बी चे भरपूर प्रमाण आहे.

ज्यामुळे केस मजबूत होतात. एक चमचा अ‍ॅव्होकाडो तेल आणि एक चमचा नारळाचे तेल एकत्र घ्या. आंघोळ करण्यापूर्वी दोन्ही तेल मिक्स करून केसांचा मसाज करा. तीस मिनिटांनंतर आपले केस स्वच्छ धुऊन घ्या.

साहित्य -

  1. एक अ‍ॅव्होकाडो

  2. एक अंड

  3. दोन चमचे मध

  4. दोन चमचे ऑलिव्ह ऑइल

ही सर्व सामग्री एकत्र घ्या आणि त्याची पेस्ट तयार करा. यासाठी तुम्ही मिक्सरचा वापर करू शकता. पेस्ट तयार झाल्यानंतर केसांना लावा. तीस मिनिटांसाठी हेअर मास्क राहू द्यावे किंवा तुम्ही रात्रभर देखील हे मास्क लावून ठेवू शकता. यासाठी शॉवर कॅपचा वापर करा. दुसऱ्या दिवशी सकाळी शॅम्पू आणि थंड पाण्यानं केस धुवावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Petrol Pump: पुण्यात सातनंतर पेट्रोलपंप सुरु राहणार का? संध्याकाळी काय निघाला तोडगा?

Pachod Crime : पाच लाखासाठी मुकादमाकडून ऊसतोड कामगाराचे अपहरण; पाचोड येथे गुन्हा

Pregnant Woman and Traffic Police Viral Video : भररस्त्यात प्रेग्नंट महिला ओरडत होती, पण तरीही वाहतूक पोलिस स्कूटी चालवतच राहिला, नक्की काय घडलं?

Viral Video Tractor : नाद केला पण वाया नाही गेला, ट्रॅक्टरवाल्या भावाने स्पिकरवर फॉरेनर नाचवल्या; 'चुनरी चुनरी' चा इन्स्टावर व्हिडीओ व्हायरल

Latest Marathi Breaking News Live Update: म्हाडाचे भाडेतत्त्वावरील घरे धोरण मसुदा तयार

SCROLL FOR NEXT