Hanuman Jayanti 2024  esakal
लाइफस्टाइल

Hanuman Jayanti 2024 : हनुमान जयंतीदिवशी अशी करा मारूतीरायांची पूजा, आर्थिक संकटे होतील दूर

हनुमान जयंती मंगळवारी किंवा शनिवारी येते तेव्हा तिचे महत्त्व आणखी वाढते

सकाळ डिजिटल टीम

Hanuman Jayanti 2024 :

रामनवमी झाल्यानंतर श्री रामांचे परमभक्त श्री हनुमंतांचा जन्मसोहळा साजरा केला जातो. अवतारी मारूतीरायांबद्दल अशी मान्यता आहे की, ते आजही जिवंत आहेत. महाबली हनुमानांच्या नामात इतकी ताकद आहे की, आजही भूत,पिशाच्छ पळून जातात.

त्यामुळे एखादा वाईट प्रसंग ओढावला असेल, किंवा संकटात सापडलेल्या व्यक्तीच्या तोंडी आपसुकच हनुमान चालिसा येते. अशा या दिव्य भगवंतांचा जन्मोत्सव सोहळा आज साजरा होणार आहे. आज हनुमंतांची पूजा कशी करायची, त्याचे विधी कसे करायचे याची माहिती घेऊयात.

आज आहे जन्मकाळ

चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला श्री हनुमंतांचा जन्म झाला होता. त्यामुळे यंदा चैत्र पौर्णिमा म्हणजेच काल पहाटे ३.५ वाजता सुरू झाली आहे. तर ती आज म्हणजेच दुसऱ्या दिवशी पहाटे ५.१८ वाजता समाप्त होईल.

जेव्हा हनुमान जयंती मंगळवारी किंवा शनिवारी येते तेव्हा तिचे महत्त्व आणखी वाढते, असे सांगितले जाते.

हनुमंतांच्या पूजेसाठी योग्य मुहूर्त

तसं पाहिलं तर संपूर्ण दिवस आपण हनुमान जयंती साजरी करतो. पण भगवंतांची पूजा करण्यासाठी दोन मुहूर्त शास्त्रात दिले आहेत. एक म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी सकाळी ९ वाजून ३ मिनिटांपासून दुपारी १ वाजून ५८ मिनिटांपर्यंत पहिला मुहूर्त आहे.  

तर दुसरा मुहूर्त, त्याच दिवशी रात्री ८ वाजून १४ मिनिटांपासून सुरू होऊन रात्री ९ वाजून ३५ मिनिटांपर्यंत आहे. (Hanuman Janayti 2024)

हनुमंतांची पूजा कशी करावी

पहाटे उठून स्नान करून बजरंगबलीच्या नामाचा जप करावा. ९ नंतर मुहूर्त आहे त्यामुळे सर्वात आधी उत्तर-पूर्व दिशेला पाट मांडावा. त्यावर लाल रंगाचे कापड अंथरावे. हनुमान आणि श्री रामांच्या फोटोची मांडणी त्यावर करावी.

हनुमानाला लाल तर श्री रामांच्या प्रतिमेला पिवळ्या रंगांची फुले अर्पण करावीत. मंत्रोत्चार करावेत. श्री राम नामाचा जप करावा. आपण पूजा करत असलेल्या हनुमंतांच्या तोंडीही श्री राम नाम होते. त्यामुळे, तुम्हीही या दिवशी अखंड राम मानाचा जागर करावा. तसेच, नैवेद्य म्हणून लाडू अर्पण करावे आणि फोटोजवळ तुळशीही ठेवावी.  

श्री राम जप – ऊं राम रामाय नम:

श्री हनुमान जप – ऊं हं हनुमते नम:

आर्थिक समस्या दूर होण्यासाठी उपाय

आर्थिक समस्या दूर करण्यासाठी श्री हनुमंत आपल्याला मदत करू शकतात. त्यासाठी वडाच्या झाडाचे पान तोडून ते हनुमंतांच्या फोटोसमोर ठेवा. त्यावर अष्टगंधांने श्री राम लिहा आणि तुमच्या मनातील सर्व गोष्टी त्यासमोर व्यक्त करा. आणि हे पान पर्समध्ये ठेवा, असे केल्यास तुमची आर्थिक संकटे दूर होतील असे शास्त्रात सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT