लाइफस्टाइल

Married Life Tips : आई अन् बायकोच्या भांडणाला वैतागलात? 'हे' उपाय ठरतील फायदेशीर

सासू सुनेचे नाते हे नाजूक आणि अति संवेदनशील असते.

सकाळ डिजिटल टीम

Happy Married life Tips : सासू सुनेचे नाते हे नाजूक आणि अति संवेदनशील असते. या नात्यात एकदा खटका उडला की, भांडणांची मालिका सुरू होते. मुलाच्या लग्नानंतर सुरूवातीला सुनेचे भरभरून कौतुक करणारी सासू आणि सून सर्वत्र पहायला मिळते. पण, एकमेकांसोबत २ महिने घालवले की, वाद सुरू होतात. या दोघींच्या भांडणात बिचाऱ्या पतीचे मात्र हाल होतात.

असे म्हणतात की, सासू सुनेचे नाते सांभाळणे ही दोघींची जबाबदारी आहे. पण, हे नाते बिघडण्यामागे काही शास्त्रीय कारणेही असतात. सासू सुनेचे असो किंवा इतर कोणासोबतही घरात वाद होणे म्हणजे घरात काहीतरी बिनसलेले असते.

लग्नानंतर मुलाला आणि सुनेला बोलतात की, तूम्ही बदलला आहात. पण, वेळेनुसार, काळानूसार बदल हा होतोच आणि तो स्वीकारणे घरातील सदस्यांना अवघड जाते. त्यामुळे वादाला तोंड फुटते. हे वाद टाळण्यासाठी नेमकं काय करावं हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

विष्णू देवता करतील मदत

जर, तुमच्या घरात विनाकारण भांडणे होत असतील आणि तूम्ही त्याला कंटाळला असाल तर, दररोज सकाळी लवकर स्नान करून विष्णूंची पूजा करावी. भगवान विष्णूची उपासना केल्याने पती-पत्नींमधील प्रेम वाढते. तसेच सासू-सासऱ्यांचे नातेही दृढ होण्यास मदत होते.

तुळशीसमोर लावावा तुपाचा दिवा

घरातील वाद टाळण्यासाठी सकाळी स्नान करून तुळशीसमोर तुपाचा दिवा लावावा आणि त्यानंतर ‘ओम नमः भगवते वासुदेवाय नमः’ या मंत्राचा जप करावा. यामुळे पतीसोबतचे नाते घट्ट होण्याबरोबरच सासू,सासऱ्यांशी असणारे मतभेद टाळण्यास मदत होते. सकाळी तूळशीच्या सानिध्यात राहिल्याने आरोग्यासही फायदा होतो आणि मनही प्रसन्न राहते. तुळशीसमोर एखादी इच्छा व्यक्त केल्याने ती पूर्ण होते तसेच, घरात सुख-समृद्धी येते.

सूर्यदेवाला अर्पण करा पाणी

सकाळी आंघोळीनंतर एका भांड्यात पाणी घेऊन त्यात थोडी हळद टाकावी. हे पाणी सूर्यदेवाला अर्पण करावे. या उपायाने घरातील कहल संपूष्टात येण्यास मदत होते. तसेच सासू-सासऱ्यांसोबतच्या नात्यातही गोडवा वाढतो. या उपायाची सुरूवात गुरूवारी करावी.

पाण्यात टाकावा चांदीचा तुकडा

घरातील पिण्याच्या पाण्यात चांदीचा एक छोटा तुकडा टाकल्यासही घरातील वाद संपुष्टात येतात. जर तुमच्याकडे चांदीचा तूकडा नसेल तर, तुम्ही चांदीचे नाण्याचाही वापर करू शकता. हा चांदीचा तुकडा नेहमी पाण्यात ठेवावा आणि तेच पाणी स्वयंपाकासाठी, पिण्यासाठी वापरावे. चांदी हे चंद्राचे प्रतीक असून चंद्राचा गुणधर्म शांत आहे. त्यामुळे घरातील सदस्यांचे डोके शांत करण्यात हे पाणी मदतगार ठरते.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT