Happy New Year 2024  esakal
लाइफस्टाइल

Happy New Year 2024 : नववर्षाच्या स्वागताला कधीच कोणाला या वस्तू भेट म्हणून देऊ नका, नंतर पश्चाताप होईल

नात्यातील प्रेम वाढवण्यासाठी या गोष्टी देऊ शकता भेट

Pooja Karande-Kadam

Happy New Year 2024 :

लवकरच 2024 या नव्या वर्षाचे आगमन होणार आहे. नवीन वर्षाचे आगमन होताच शुभेच्छा, न्यु इअर सेलिब्रेशनच्या पार्टीचे नियोजन होणार आहे. नवीन वर्षात लोक आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना भेटवस्तू देखील देतात. नव्या वर्षाची आठवण म्हणून या भेटवस्तू नेहमी लक्षात रहाव्यात अशा पद्धतीने दिल्या जातात. 

एखाद्या व्यक्तीबद्दल आपले प्रेम किंवा आदर व्यक्त करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्याला भेटवस्तू देणे. भेटवस्तू दिल्याने नातेसंबंध मजबूत होतात.  जर तुम्हालाही तुमच्या प्रिय व्यक्तीला नवीन वर्षात भेटवस्तू द्यायची असेल तर ज्योतिषशास्त्राचे काही नियम नक्की जाणून घ्या. 

ज्योतिषी मानतात की काही वस्तू कधीही भेट म्हणून देऊ नयेत. असे केल्याने नात्यातील गोडवा हळूहळू कमी होऊ लागतो. चला तर मग जाणून घेऊया अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या नवीन वर्षात कोणालाही गिफ्ट म्हणून देऊ नयेत.

शूज आणि चप्पल

कोणालाही भेट म्हणून कधीही बूट किंवा चप्पल देऊ नये कारण शूज आणि चप्पल गरिबीचे प्रतीक मानले जाते. या वस्तू भेट म्हणून दिल्याने गरिबी कधीच दूर होत नाही. पण अशा भेटवस्तूमुळे ज्याला भेटवस्तू द्याल त्याला गरीबीचा सामना करावा लागेल.

घड्याळ आणि रुमाल

नववर्षानिमित्त अनेक लोक घड्याळ गिफ्ट देतात. खास करून पत्नी आपल्या पतीला हे गिफ्ट देते. पण असे अजिबात करू नका. रुमाल दिल्याने नकारात्मकता वाढते आणि नात्यात गैरसमज निर्माण होतात असा समज आहे. त्याचबरोबर एखाद्याला घड्याळ दिल्याने चांगला काळही खराब होऊ लागतो.

धारधार वस्तूस हत्यार

भेट देताना लक्षात ठेवा की त्यात कोणतीही तीक्ष्ण वस्तू असू नये. ज्योतिषांच्या मते, तीक्ष्ण वस्तू भेट म्हणून दिल्याने नातेसंबंधात विश्वासघात होतो. तुम्हालाही अशा वस्तू भेट म्हणून मिळाल्या असतील तर त्या कुणाला तरी दान करा. चुकूनही सोबत ठेवू नका.

पर्स किंवा बॅग
पुरूष मंडळी भेट देण्यासाठी हमखास या गोष्टींचा विचार करतात. कारण, महिलांसाठी गरजेची वस्तू असते पर्स किंवा बॅग. त्यामुळे बॅग भेट द्यावी असा सगळेच विचार करतात. पण, असं करू नका. त्यामुळे एखाद्याची आर्थिक स्थिती बिघडू शकते,असे ज्योतिषशास्त्र सांगते.

देवी-देवतांच्या मूर्ती

देवी देवतांच्या मूर्ती कोणालाही भेट देणे टाळावे. देव ही भेट म्हणून देण्याची वस्तू नाही. आणि असं म्हणतात की, देव स्वत: विकत घेऊन त्यांची पूजा केली तर त्यांचा आशिर्वाद आपल्याला लाभतो. त्यामुळे एखाद्याला देव कधीच भेट म्हणून देऊ नका.

या गोष्टी भेट द्या प्रेम वाढेल

  • दागिना

  • झाड

  • कपडे

  • पुस्तकं

  • इलेक्ट्रॉनिक वस्तू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Railway Station Expansion : पुणेकरांसाठी गूड न्यूज! रेल्वे स्थानकावर येणार 6 नवीन फलाट; 400 कोटींचा मेगा प्लॅन तयार, आता 'या' मार्गाने मिळणार एन्ट्री

समृद्धी महामार्गावर दुचाकींचा धोकादायक सुसाट प्रवास; प्रवेशबंदी धाब्यावर, व्हिडिओ व्हायरल

Bullock Cart Race Accident : बैलांच्या पायात अडकला तरुण, बैलगाडीखाली चिरडले जाताना सुदैवाने बचावले; शर्यतीत दुचाकीस्वारांचा थरकाप उडवणारा अपघात

कथानकातील ढिसाळपणा पडला भारी ! ठरलं तर मगचा टीआरपी घसरला, स्टार प्रवाहची 'ही' मालिका ठरली गेमचेंजर

Horoscope : उद्या बनतोय संकष्टी लाभ योग! पुढचे तीन दिवस 'या' 3 राशींसाठी गोल्डन टाइम; पैशाची अडचण होईल दूर, अडकलेल्या कामांची पूर्ती

SCROLL FOR NEXT