plants-keep-mosquitoes-away-from-home esakal
लाइफस्टाइल

Mosquito Repellent Plants : 'ही' पाच झाडं लावाल तर घरातून झटक्यात पळतील डास

डास हे अनेक गंभीर आजारांचं कारण ठरतं.

सकाळ डिजिटल टीम

Mosquito Repellent Plants : उन्हाळा आणि पावसाळा सुरू होताच डासांची समस्या सुरू होते. अशात अनेकदा सायंकाळच्या वेळी आपण घराच्या गच्चीवर, अंगणात किंवा बालकनीत बसताना डासांचा खूप त्रास होतो. हेच डास मग अनेक गंभीर आजारांचं कारण ठरतं. अशात डासांपासून सावध राहणे, गरजेचं असतं.

आज आम्ही तुम्हाला पाच झाडीविषयी सांगणार आहोत. जर ही झाडी तुमच्या घरी असेल तर तुमच्या घरात कधीच चुकूनही डास येणार नाही. चला तर जाणून घेऊया ती पाच झाडी कोणती?

लेमन ग्रास: हल्ली अनेकांच्या घरी लेमन ग्रास असतं. खरं तर अनेक लोक या ग्रासचा वापर घरी चहा बनविण्यासाठी करतात पण तुम्हाला माहित नसेल या ग्रासमुळे डास सुद्धा घरातून पळतात. डास पळवणाऱ्या अनेक औषधांमध्ये या ग्रासचा वापर केला जातो.

झेंडू - झेंडूचं रोपटं फक्त घराचं सुशोभिकरण करत नाही तर झेंडूच्या वासाने घरातील डासही दूर पळतात. याची फुलंच नाही तर त्याचं रोपटंही तितकचं फायदेशीर असतं.

लसूणचे रोपटे - घरात लसूणचे रोपटे असेल तर तुम्ही डासांपासून दूर राहू शकता. लसूणच्या वासाने घरातील डास दूर पळतात आणि पुन्हा कधीही येत नाही.

लॅवेंडर: डासांना दूर पळवण्यासाठी डास रिपेलेंट्सचा वापर केला जातो त्यामध्येही लॅवेंडर ऑईल असतं. ज्यामुळे डास दूर पळतात.

तुळस - डास पळवण्यासाठी तुळशी हा बेस्ट पर्याय आहे. प्रत्येकाच्या घरी तुळस असते. त्यामुळे डासांना पळवायचं असेल तर घरी तुळशीचे रोपटे लावा. एकापेक्षा जास्त रोपटे लावले तर अधिक चांगले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games 2026: चक दे इंडिया! भारताचा पाकिस्तानवर रोमहर्षक विजय; हॉकीचं सुवर्णपदक आता एक विजय दूर...

Hingoli Court : चोर कोर्टात तारखेसाठी आले अन् इन्व्हर्टर, बॅटरीच पळवली; हिंगोलीत चोरट्यांचा प्रताप, काय आहे प्रकरण?

Ration Card: 'त्या' शिधापत्रिका निष्क्रिय होणार, सहा महिने धान्याची उचल नसल्यास सरकार घेणार मोठा निर्णय

Latest Marathi News Live Update : 'काळजी करु नका, न्याय मिळवून देऊ'; उद्धव ठाकरेंकडून प्रदीप पुर्णेकर यांच्या कुटुंबीयांना ग्वाही

Shrigonda News: विवाहितेसह २२ वर्षीय तरुणाने एकत्रच संपवलं आयुष्य; नगरमधील घटनेनं खळबळ; पोलीस तपास सुरू

SCROLL FOR NEXT