Health Tips sakal
लाइफस्टाइल

Health Tips: दूधात तूप मिसळून प्यायल्याने होतात मोठे फायदे, पोटाच्या समस्या होतात दूर!

रोज रात्री दूध प्यायल्याने थकवा दूर होतो.

Aishwarya Musale

स्वतःला निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी आपण अनेक मार्गांचा अवलंब करतो. त्यासाठी पौष्टिक आणि जीवनसत्त्वांनी परिपूर्ण असा आहार रोज घेतला जातो. फळे, भाज्यांसह इतर घरगुती पद्धतींचा अवलंब केल्यास शरीर निरोगी होते. बदलत्या जीवनशैलीत छोट्या छोट्या घरगुती उपायांनी अनेक समस्यांवर मात करता येते.

असाच एक उपाय म्हणजे दूध पिणे. रोज रात्री दूध प्यायल्याने थकवा दूर होतो. याशिवाय दुधात हळद मिसळून प्यायल्याने अनेक आरोग्यदायी फायदे होतात. तुम्ही हळदीचे दूधही प्यायले असेल. पण तुम्ही कधी तूप मिसळलेले दूध प्यायले आहे का? चला, आज आम्ही तुम्हाला दुधात तूप पिण्याचे फायदे सांगणार आहोत.

1 डायजेशन: टाईम्स ऑफ इंडियानुसार, दुधात एक चमचा देशी तूप टाकून प्यायल्याने पचनक्रिया मजबूत राहते. दुधात तूप टाकून ते प्यायल्याने पोटाशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागत नाही. याच्या सेवनाने वजन कमी होण्यासही मदत होते. तुम्हालाही बद्धकोष्ठतेची समस्या असेल तर गाईच्या दुधात तूप घालून रोज प्या. यामुळे पचनक्रिया मजबूत होते. त्याच्या वापराने ऍसिडिटी दूर होते. हे पोट योग्य प्रकारे साफ करण्यास उपयुक्त आहे.

2. शक्ती वाढते: देशी तूप दुधात मिसळून प्यायल्याने शारीरिक शक्ती वाढते. त्याच्या वापराने तुम्ही कोणतेही काम दीर्घकाळ करू शकता. त्यामुळे स्नायूंनाही ताकद मिळते. दुधात तूप मिसळून प्यायल्यानेही हाडे मजबूत होतात.

3. प्रतिकारशक्ती वाढते: दुधात तूप मिसळून प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. त्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. हे आतड्यांसाठी देखील फायदेशीर आहे. पोटाची जळजळ दूर करण्यासाठी देखील हे फायदेशीर आहे.

4. सांधेदुखीपासून आराम : दुधात तूप मिसळून प्यायल्याने सांधेदुखीपासून आराम मिळतो. देशी तूप दुधात मिसळून रोज प्यायल्याने दुखण्यापासून आराम मिळतो. तुपात ओमेगा ३ आणि ६ फॅटी अॅसिड असतात. यासोबतच दुधामध्ये असलेले कॅल्शियम देखील हाडे मजबूत करते. यामुळे पायातील क्रॅम्पही दूर होतात. त्यामुळे शरीराच्या दुखण्यावरही आराम मिळतो.

5. गरोदर महिलांसाठी फायदेशीर : ज्या महिला गरोदर आहेत, त्यांनी रोज तूप मिसळून दूध प्यायल्यास त्यांचे आरोग्य सुधारते. यासोबतच गर्भात वाढणाऱ्या मुलाचा विकास चांगल्या पद्धतीने होतो. हे करण्यापूर्वी, डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT