health Avoid leafy vegetables Tomato Baingan in the monsoon season  
लाइफस्टाइल

Health: पावसाळ्यात 'या' भाज्यांपासून सावध रहा

पावसाळ्यात आपल्याला गरम, चमचमीत खायला आवडत असलं तरी काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं असतं.

सकाळ डिजिटल टीम

पावसाळ्यात आपल्याला गरम, चमचमीत खायला आवडत असलं तरी काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं असतं. हवेतील दमटपणामुळे आणि पाण्यातील अशुद्धतेमुळे बरेच संसर्गजन्य आजार पसरतात. त्यामुळे कोणताही पदार्थ खाताना विशेष काळजी घ्यावी लागते. त्यामध्ये विशेषकरुन पालेभाज्या अन् फळभाज्या खाताना. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांत कोणत्या भाज्या खाणे आरोग्यासाठी घातक असते हे जाणून घेऊ.

पालेभाज्या खाऊ नका

पावसाळ्यातील ओलाव्यामुळे हिरव्या पालेभाज्यांमध्ये जंतू वाढण्याचा धोका असतो. सामान्य दिवसांमध्ये, हे जंतू कडक सूर्यप्रकाशात मरतात किंवा निष्क्रिय होतात, परंतु पावसाळ्यात ते अधिक सक्रिय असतात.

वांगी

वांगी पावसाळ्याच्या दिवसांत वांग्यामध्ये किडे होण्याची शक्यता असल्याने या काळात वांगी खाणे टाळावे. या काळात वांगी खाल्ल्याने खाज सुटणे, त्वचेवर चट्टे उठणे, पोटातील संसर्ग अशाप्रकारच्या समस्या उद्भवू शकतात.

फ्लॉवर

पावसाळ्यात कोबी, फ्लॉवर, ब्रोकोली, ब्रसेल्स स्प्राउट यांसारख्या भाज्या खाणंसुद्धा टाळायला हवं. जास्त दमटपणामुळे विषाणू झपाट्यानं वाढतात. तसंच भाज्यांची स्वच्छता नीट केली जात नाही. त्यामुळे त्या दूषित होतात.

कच्च्या भाज्या खाणं टाळा

पावसाळ्यात कच्च्या भाज्यांऐवजी वाफवलेल्या किंवा उकडलेल्या भाज्या खाणं फायदेशीर ठरेल. कारण कच्च्या भाज्यांमध्ये बॅक्टेरिया आणि विषाणू असतात ज्यामुळे पोटाची समस्या होऊ शकते.

मशरूम

मशरूम ओलसर जमिनीत वाढतात आणि त्यात बॅक्टेरियाची वाढ होऊ शकते ज्यामुळे एकदा खाल्ल्यानंतर संसर्गाचा धोका वाढतो, विशेषतः पावसाळ्यात. त्यामुळे पावसाळ्यात मशरूमला नाही म्हणलेलेच बरे.

टोमॅटो खाताना काळजी घ्या

पावसाळ्यात टोमॅटो खाताना काळजी घेणे गरजेचे आहे. कारण हवेतील जास्त आर्द्रतेमुळे टोमॅटोला लवकर बुरशी लागते. बुरशीजन्य संसर्गाचा धोकाही जास्त असतो. त्याच्या सेवनाने कफ दोष वाढू शकतो. त्यामुळे जर टोमॅटो खायेचेच झाले तर, टोमॅटो चांगले धुऊन खावेत. शक्य असेल, तर कीटकनाशकांचा प्रभाव दूर ठेवण्यासाठी ऑरगॅनिक पद्धतीने पिकवलेल्या टोमॅटोचा वापर करावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

SCROLL FOR NEXT