लाइफस्टाइल

उष्णतेमुळे हैराण झालात? मग आहारात करा सब्जा बीचा समावेश

शर्वरी जोशी

उन्हाळ्याला आता खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. त्यामुळे वातावरणातही एकप्रकारचा उष्णपणा जाणवू लागला आहे. उन्हाळा म्हटलं की योगायोगाने या ऋतूमध्ये होणारे आजारही डोकंवर काढतात. यात घामोळे, डोकंदुखी, पित्त असे त्रास तर हमखास जाणवतात.

त्यामुळेच या समस्यांपासून दूर रहायचं असेल तर आहारात पौष्टिक आणि सकस पदार्थांचा समावेश करायला हवा. तसंच उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणाऱ्या पदार्थांचाही आहारात समावेश करायला हवा.

त्यामुळे रसदार फळे, पालेभाज्या, फळांचा ज्यूस, ताक, सरबत यांचं आवर्जुन सेवन केलं पाहिजे. यामध्येच सब्जाच्या बीचं सेवन करणंही शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे. त्यामुळेच सब्जाच्या बीचे फायदे कोणते ते पाहुयात.

१. शरीराला थंडावा मिळतो.

२. युरीन इन्फेक्शनचा त्रास कमी होतो.

३. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.

४. बद्धकोष्ठता, अपचन, गॅसेसचा त्रास कमी होतो.

५. मूत्र विसर्जन करतांना होणारी दाह कमी होते.

६. वजन नियंत्रणात राहते.

कसं करा सब्जाच्या बीचं सेवन?

सब्जाच्या बीचं सेवन करणं अत्यंत सोपं आहे. यासाठी चिमुटभर सब्जा बी घेऊन ती पाण्यात टाकावी. पाण्यात टाकल्यानंतर या बिया फुलून येतात. त्यानंतर या बिया पाण्यासकट प्याव्यात. या बिया खासकरुन मिल्कशेक, फालुदा, आईस्क्रीममध्ये मिक्स करुन खाल्ल्या जातात.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: जगातील प्रत्येक १३ पैकी एक देश अमेरिकेच्या रडारवर; ट्रम्प यांच्याकडून 'या' देशांना उद्ध्वस्त करण्याची धमकी

Latest Marathi News Live Update : नसरापूरमधील चिमुरडीवर अत्याचार; आरोपीविरुद्ध दोषारोप निश्चित, खटल्याची रोज सुनावणी होणार

Muslim Gorakshak Dal : 'गाय राष्ट्रीय पशू झालीच पाहिजे'; मिरजेत मुस्लिम गोरक्षक दलाकडून जनजागृती मोहीम, 'गांधीगिरी' करत दिला गोसंरक्षणाचा संदेश!

IPL 2026: वैभव सूर्यवंशीला Orange Cap च्या शर्यतीत ३ खेळाडू देणार टक्कर... विराट कोहली या शर्यतीतही शेवटून पहिला, किती धावांचे अंतर?

MLC Election: जागेसाठी महायुतीत चढाओढ! शिंदेंनंतर फडणवीसांची दिल्लीवारी; पीएम मोदींसोबतच्या बैठकीमागे काय?

SCROLL FOR NEXT