Health Tips sakal
लाइफस्टाइल

Health Tips: रिकाम्या पोटी ग्रीन टी पिणे योग्य आहे का? जाणून घ्या काय म्हणतात तज्ज्ञ

सकाळी रिकाम्या पोटी ग्रीन टी पिणे योग्य आहे का?

Aishwarya Musale

मी जाड झाले आहे, मी काय करू, माझे वजन कमी होत नाही? असे अनेक प्रश्न तुमच्या आजूबाजूला ऐकायला मिळत असतील किंवा कधी कधी तुम्ही स्वतः इतरांना स्वतःबद्दल विचारत असाल. हे सर्व सामान्य प्रश्न आहेत जे लोक सहसा एकमेकांना विचारतात. अशा परिस्थितीत लोक वेगवेगळे उपायही करतात.

काही लोक वजन कमी करण्याच्या संपूर्ण प्रक्रियेत ग्रीन टी वापरणे चांगले मानतात. काही लोक ऑफिस, घरी किंवा बाहेरगावी ग्रीन टी पिणे पसंत करतात. तज्ज्ञांचे मत आहे की ग्रीन टी शरीराला डिटॉक्स करण्याचे काम करते तसेच वजन कमी करण्यासाठी उत्तम आहे. पण यासोबतच प्रश्न पडतो की जर तुम्ही ग्रीन टी प्यायले तर ते कधी प्यायची. रात्री झोपण्यापूर्वी पिणे चांगले की सकाळी रिकाम्या पोटी?

काही आहारतज्ज्ञांचा असा विश्वास आहे की तुम्ही दुधाच्या चहाच्या बदल्यात ग्रीन टी घेऊ शकता. तुम्ही दिवसातून २-३ कप आरामात पिऊ शकता. आता प्रश्न असा येतो की सकाळी रिकाम्या पोटी ग्रीन टी पिणे योग्य आहे का?

सकाळी रिकाम्या पोटी ग्रीन टी पिणे योग्य आहे का?

आहारतज्ञांच्या मते, ग्रीन टी सर्वांनाच शोभेल असे नाही. काही लोकांना रिकाम्या पोटी ग्रीन टी पिल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

ग्रीन टी पिण्याची ही योग्य पद्धत आहे

  • ब्रेकफास्टच्या एक तास आधी तुम्ही ग्रीन टी पिऊ शकता.

  • ग्रीन टीमध्ये टॅनिन असते. यामुळे जेवणाच्या एक तास आधी घेतल्यास बद्धकोष्ठता, पोटदुखी आणि पचन किंवा पोटाशी संबंधित समस्यांपासून आराम मिळेल.

  • सकाळी आणि संध्याकाळी ग्रीन टी प्यायल्याने तुमची चयापचय क्रिया मजबूत होते आणि वजन कमी होण्यासही मदत होते.

ग्रीन टी पिण्याची योग्य वेळ कोणती?

  • तुम्ही सकाळी व्यायाम करण्यापूर्वी अर्धा तास आधी ते पिऊ शकता

  • सकाळी 11 ते 12 दरम्यान पिऊ शकता

  • दुपारच्या जेवणाच्या 1 तास आधी पिणे फायदेशीर आहे

  • संध्याकाळच्या नाश्त्याच्या 1-2 तासांनंतर ते पिऊ शकतातुम्ही सकाळी व्यायाम करण्यापूर्वी अर्धा तास आधी ते पिऊ शकता

  • सकाळी 11 ते 12 दरम्यान पिऊ शकता

  • दुपारच्या जेवणाच्या 1 तास आधी पिणे फायदेशीर आहे

  • संध्याकाळच्या नाश्त्याच्या 1-2 तासांनंतर ते पिऊ शकता

  • दिवसातून फक्त 3-4 कप ग्रीन टी प्या, यापेक्षा जास्त पिऊ नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shiv Sena Split: निवडणूक आयोगाचा निर्णय चुकीचा? ठाकरे गटाचा सुप्रीम कोर्टात दावा; ‘शिवसेनेत नव्हे, विधिमंडळात फूट’

Ganeshotsav Special Trains: नागपूर, मुंबई आणखी विशेष रेल्वे धावणार; गणेशोत्सवात चाकरमान्यांना आधार

Kolkata Hotel Fire : कोलकात्यात हॉटेलला भीषण आग; चिमुकल्यासह ९ जणांचा मृत्यू, मध्यरात्री अग्नितांडवाने शहर हादरले

Marathi News Live Updates : सर्पदंश अधिसूचित आजार; प्रत्येक घटनेची नोंद बंधनकारक

Ambap School Tragedy: शाळेत हुशार, खेळात तरबेज ‘धनराज’ची एक्झिट जिव्हारी; क्रीडांगणावर सराव करताना पडल्याचे निमित्त

SCROLL FOR NEXT