लाइफस्टाइल

Health Care News : झोप पूर्ण झाली तरी थकवा जाणवतो का? यापासून सुटका मिळवण्यासाठी हे उपाय करतील मदत

काही जणांना पुरेशी झोप घेतली तरी सकाळी थकवा जाणवतो, यापासून सुटका मिळवण्यासाठी कोणत्या सवयी मदत करतात जाणून घ्या.

Aishwarya Musale

निरोगी राहण्यासाठी ज्याप्रमाणे पौष्टिक आहाराची गरज असते, त्याचप्रमाणे पुरेशी झोप ही माणसासाठी खूप महत्त्वाची असते. प्रत्येक व्यक्तीला किमान 7-8 तास झोप घेण्याचा सल्ला दिला जातो.

पण काही लोकांना ही समस्या असते की रात्री पुरेशी झोप घेतल्यानंतरही त्यांना दिवसभर आळस जाणवतो. म्हणजेच 8 तास झोपल्यानंतरही त्यांना सतत झोप येते.

जर तुम्ही देखील अशा लोकांपैकी एक असाल, ज्यांना 10 ते 12 तास झोपल्यानंतरही थकवा किंवा झोप येत असेल, तर तुम्हाला काही गोष्टी बदलल्या पाहिजेत.

पुरेशी झोप घेतल्यानंतरही खूप थकवा जाणवतो, तुम्हालाही असे काही वाटत असेल तर सकाळी लवकर उठले पाहिजे. सकाळी लवकर उठल्यास त्यानंतर योगासने करावीत. यामुळे तुमचे शरीर पूर्णपणे तंदुरुस्त राहते. हे तुमचे मन ताजे आणि सक्रिय ठेवते.

जर तुम्हाला खूप थकवा जाणवत असेल तर तुम्ही तुमच्या शरीराची मालिश करावी. यामुळे तुमचा संपूर्ण दिवस चांगला जाईल. ध्यान केल्याने तुमचे मन शांत राहते, त्यामुळे तुम्ही दररोज 20 मिनिटे ध्यान करावे. तुमची मज्जासंस्था आणि मेंदू सक्रिय ठेवते. तुम्ही तुमच्या खाण्याच्या सवयींची चांगली काळजी घेतली पाहिजे. खूप हेवी अन्न खाणे टाळावे. हेवी अन्न खाल्ल्याने दिवसभर आळस येतो.

रात्री कधीही उपाशी झोपू नका

तूम्ही कधीही उपाशी झोपू नका. ज्यामुळे तुम्हाला शांत झोप मिळणं कठीण होईल. त्यामुळे थोडफार खाऊन मगच झोपण्याचा प्रयत्न करा.

रात्री झोपण्यापूर्वी पुस्तक वाचा

झोप येण्यासाठी लोक अनेक प्रयोग करतात. लोकांनी झोप येण्यासाठी रात्रीच्यावेळी पुस्तक वाचावे. पुस्तक डोळ्यासमोर धरल्यास शांत झोप लागते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT