लाइफस्टाइल

Almond Milk Benedits : वजन कमी करण्यापासून ते रक्तदाब नियंत्रित ठेवण्यापर्यंत... बदामाचं दूध पिण्याचे आहेत जबरदस्त फायदे

बदामाचं दूध पिण्याचे आहेत जबरदस्त फायदे

Aishwarya Musale

बदामामध्ये सर्वात अधिक लो फॅट असते. तसेच बदामामध्ये प्रथिने अधिक असल्याने शरीराला उपयुक्त ठरते. बदामाच्या सेवनाने समरणशक्ती वाढते व डोळे तेजस्वी होण्यास मदत होते. त्यामुळे बदामाचे सेवन आपल्या रोजच्या आहारात करणे महत्वाचे आहे. बदामाचे दूध हे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे.

जर आपण रोज बदाम किंवा बदामाच्या दुधाचे सेवन केले तर शरीरातील अधिक समस्या दूर होतील. कारण बदामामध्ये कॅल्शियम, मॅगनेशियम, मॅंगेनिज, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन ई हे घटक असून ते आपल्या शरीरासाठी उपयुक्त मानले जातात. चला तर मग जाणून घेऊयात बदाम दूध पिण्याचे फायदे.

दररोज बदामाचे दूध पिणे सुरक्षित आहे का?

होय, तुम्ही दररोज बदामाचे दूध पिऊ शकता कारण ते सामान्य दुधाच्या तुलनेत पूर्णपणे सुरक्षित आहे. जर तुम्हाला नट्सची कोणत्याही प्रकारची अ‍ॅलर्जी असेल तर ते खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

1. कॅल्शियम

बदामाचे दूध हे कॅल्शियमचा एक उत्तम स्रोत आहे. त्यात व्हिटॅमिन डी देखील चांगली असते, जे हाडे मजबूत करण्यास आणि हाडांचे आरोग्य सुधारण्यास मदत करते.

2. डेअरी-मुक्त आणि शाकाहारी

बदामाचे दूध बदामापासून बनवले जात असल्याने ते शाकाहारी आहे. तसेच, जे लोक लैक्टोज इंटॉलरेंस आहेत ते आरामात सेवन करू शकतात.

3. वजन कमी करण्यासाठी

काही तज्ज्ञांच्या मते बदामाच्या दुधामध्ये लो कॅलरीज असल्याने आपल्या शरीरात फॅक्ट्स तयार होत नाही. जी माणसं फॅक्ट्स युक्त पदार्थ खात असतात त्यांचासाठी बदामाचे दूध उत्तम आहे. कारण बदामाच्या दुधात ८० टक्के कमी कॅलरीज असतात.

4. रक्तातील साखर वाढत नाही

बदामाच्या दुधात जास्त कर्बोदके नसतात, त्यामुळे रक्तातील साखर वाढत नाही. बदामाच्या दुधात साखरेचं प्रमाण कमी असते आणि फायबर अधिक असते.

5. अँटिऑक्सिडंट

व्हिटॅमिन ई आणि अँटिऑक्सिडंट्स बदामाच्या दुधात आढळतात जे आपल्या पेशींना मुक्त रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून वाचवण्यासाठी महत्वाचे आहे. याव्यतिरिक्त, ते आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास देखील मदत करू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder 5 KG पाच किलो एलपीजी सिलिंडरबाबत नवा नियम, खरेदीसाठी ओळखपत्र बंधनकारक

बारामतीत काँग्रेसनं उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? अजित पवारांच्या विरोधात डिपॉझिट झालेलं जप्त

RCB vs CSK: अरे काय केलं... विराट कोहलीचा शिवम दुबेने एकदम सोपा कॅच सोडला; अनुष्का शर्माही शॉक; Video Viral

अल्पवयीन बहिणींच्या लग्नाचा घाट, पोलिसांसह अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पार

SCROLL FOR NEXT