Health  sakal
लाइफस्टाइल

Health Care News: थायरॉईडपासून सुटका मिळवण्यासाठी फायदेशीर ठरेल 'हा' चहा! आता औषधं घेण्याची गरज नाही

थायरॉइड रूग्णांकरता टॉनिकसारखं काम करतो हा चहा

Aishwarya Musale

थायरॉईड हा एक गंभीर आणि वेगाने वाढणारा आजार आहे. खरं तर, घशात फुलपाखराच्या आकाराची एक छोटी ग्रंथी असते ज्याला थायरॉईड ग्रंथी म्हणतात. आजच्या काळात, थायरॉईड हार्मोनमध्ये चढ-उतार खूप सामान्य झाले आहेत. विशेषत: महिलांमध्ये हे अधिक दिसून येत आहे.

जेथे थायरॉईड लेव्हल व्यवस्थापित करण्यासाठी वैद्यकीय सल्ला खूप महत्वाचा आहे. त्याचबरोबर काही खास गोष्टींचा आहारात समावेश करून त्यावर नियंत्रण ठेवता येते. आम्ही तुम्हाला अशाच एका खास औषधी वनस्पतीपासून बनवलेल्या चहाबद्दल सांगत आहोत.

थायरॉईड पातळी नियंत्रित करण्यासाठी अश्वगंधा चहा प्या

हायपोथायरॉईडीझममध्ये अश्वगंधा चहा फायदेशीर मानला जातो.

हायपोथायरॉईडीझममध्ये थायरॉईड ग्रंथीतून बाहेर पडणाऱ्या हार्मोन्सचे प्रमाण कमी होते.

त्यामुळे वजन वाढणे, मासिक पाळी अनियमित होणे, बद्धकोष्ठता यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

आयुर्वेदात वर्षानुवर्षे अश्वगंधा वापरली जात आहे. त्यात अँटी-स्ट्रेस, अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आढळतात.

तज्ज्ञांच्या मते, अश्वगंधा चहा कोर्टिसोलची पातळी कमी करते आणि थायरॉईड हार्मोन पातळी नियंत्रित करते.

याशिवाय अश्वगंधा शरीरातील इतर हार्मोनल असंतुलनावरही नियंत्रण ठेवते.

तुम्हाला थकवा जाणवत असेल आणि अनेकदा अशक्तपणा जाणवत असेल तर हा चहा फायदेशीर ठरू शकतो.

अश्वगंधा चहा कसा बनवायचा?

साहित्य

  • अश्वगंधा - 1/4 टीस्पून

  • पाणी - 1 कप

बनवण्याची पद्धत

  • अश्वगंधा पाण्यात मिसळा.

  • ते अर्धे होईपर्यंत उकळवा.

  • रात्री झोपण्यापूर्वी किंवा जेवणानंतर अर्धा तास प्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT