crunches  sakal
लाइफस्टाइल

Health Care News: फिटनेस रुटीनमध्ये क्रंचेसचा करा समावेश, शरीरात दिसून येतील हे बदल

पोटाची चरबी कमी करण्यासाठी क्रंचेस हा देखील एक उत्तम व्यायाम आहे.

Aishwarya Musale

तंदुरुस्त राहण्यासाठी आपल्या सर्वांना व्यायाम करायला आवडतो. आपण आपल्या वर्कआउट रूटीनमध्ये अनेक प्रकारचे व्यायाम समाविष्ट करतो. यापैकी एक म्हणजे क्रंचेस. अनेकदा लोक त्यांच्या दैनंदिन वर्कआउटमध्ये क्रंचेस करतात. हे कुठेही केले जाऊ शकते, मग तुम्ही घरी असाल किंवा जिममध्ये.

हे तुमच्या स्नायूंना टोनिंग करण्यासाठी आणि शरीराची स्थिती सुधारण्यासाठी आणि मोबिलिटी बूस्ट अप करण्यासाठी खूप उपयुक्त आहे. हे अनेक व्हेरिएशन मध्ये केले जाऊ शकते. उदाहरणार्थ, तुम्ही रिव्हर्स क्रंचेसपासून ते बाइसाइकिल क्रंचेस इ.पर्यंत अनेक प्रकारांमध्ये करू शकता. क्रंचेस करण्याचे अनेक फायदे आहेत.

जर तुम्हाला तुमच्या कोर एरियाला स्ट्रेन्थन करायचा असेल तर तुम्ही निश्चितपणे क्रंचेसला तुमच्या फिटनेस रुटीनचा एक भाग बनवा. जेव्हा तुम्ही क्रंचेस करता तेव्हा ते तुमच्या ओटीपोटाच्या एरियाला टारगेट करते आणि ते नियमितपणे केल्याने तुमचे मुख्य स्नायू मजबूत होतात. ज्यामुळे कोरच्या स्थिरतेवरही सकारात्मक परिणाम होतो.

मशीनची गरज नाही

क्रंचेस करण्याचा एक फायदा असा आहे की ते करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही जिम मशीनची किंवा उपकरणांची गरज नाही. ज्याचा सरळ अर्थ असा आहे की तुम्ही ते कधीही आणि कुठेही करू शकता.

अशाप्रकारे, जर तुम्हाला जिममध्ये जाण्यास सोयीस्कर वाटत नसेल किंवा तुम्हाला जिमच्या फीसाठी तुमचे पैसे खर्च करायचे नसतील, तर तुम्ही घरी बसून तुमच्या शरीराला सहज टोन करू शकता.

क्रंचेस केल्याने, तुमचे शरीर तुमच्या टमी एरियातून अधिक टोन्ड दिसते. जसजसे तुमचे ओटीपोटाचे स्नायू क्रंचेस करून मजबूत होतात, तसतसे ते अधिक टोन्ड दिसतात.

जर तुम्हाला तुमचे वजन कमी करून तुमचे शरीर टोन करायचे असेल, तर क्रंचेस करणे तुमच्यासाठी खूप चांगले असू शकते. क्रंचेस हाई इंटेसिटी एक्सरसाइज आहे, ज्यासाठी खूप ऊर्जा आणि शक्ती लागते.

जरी ते कार्डिओ किंवा इतर व्यायामासारख्या कॅलरीज बर्न करत नाही, परंतु हा व्यायाम करताना तुम्ही तुमची ऊर्जा वापरता, ज्यामुळे तुम्ही काही प्रमाणात कॅलरी बर्न करता. यामुळे हळूहळू वजन कमी होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohan Bhagwat : "हिंदूंशिवाय जगाचं अस्तित्व राहणार नाही, आपण स्वातंत्र्यासाठी दीर्घ काळ लढा दिला"; मोहन भागवतांचे ठाम मत!

Love Rashifal 2025: डिसेंबरमध्ये गुरू व चक्र ग्रहाचे भ्रमण! ‘या’ राशींच्या प्रेमजीवनात येणार मोठा बदल

Latest Marathi News Live Update : सिन्नरच्या नायगावात गावगुंडांचा कहर! पन्नास हजारांची खंडणी न दिल्यास दुकान पेटवण्याची धमकी

दुबई एअर शोदरम्यान मृत पावलेले विंग कमांडर नमन स्याल कोण होते? पत्नीही वायूदलात अधिकारी...

Maharashtra Politics: राजकीय समीकरणांमध्ये उलथापालथ! भाजपला झटका, अनेक कार्यकर्त्यांचा ठाकरे गटात प्रवेश

SCROLL FOR NEXT