लाइफस्टाइल

Carrot Juice Benefits : निरोगी त्वचा ते रक्तातील साखरेपर्यंत, गाजराचा रस प्यायल्याने हे जबरदस्त फायदे मिळतील

हिवाळ्यामध्ये अनेक प्रकारच्या हिरव्या पालेभाज्या आणि फळे मार्केटमध्ये येतात. थंडीच्या दिवसांमध्ये आरोग्याची देखील खास काळजी घ्यावी लागते.

Aishwarya Musale

हिवाळ्यामध्ये अनेक प्रकारच्या हिरव्या पालेभाज्या आणि फळे मार्केटमध्ये येतात. थंडीच्या दिवसांमध्ये आरोग्याची देखील खास काळजी घ्यावी लागते. या दिवसांमध्ये संत्रा, पेरू, सफरचंद इत्यादी फळे मोठ्या प्रमाणात मार्केटमध्ये विक्रीला येतात.

हिवाळ्यात शरीराला अनेक आजार जडतात. शरीर निरोगी ठेवण्यासाठी खाण्याच्या चांगल्या सवयी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. रोज सकाळी गाजराचा रस प्यायल्यास तुम्हाला अनेक आश्चर्यकारक फायदे मिळतात.

गाजराचा रस शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. यामुळे अनेक आजार दूर होतात. याचा दररोज आहारात समावेश केल्यास चेहरा स्वच्छ राहील. त्वचेत एक वेगळीच चमक येईल.

गाजर पोटॅशियम, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए सह अनेक आवश्यक जीवनसत्त्वे बनलेले आहे, जे शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी खूप महत्वाचे आहेत. दृष्टी सुधारण्यासाठी तुम्ही याचे रोज सेवन करावे.

गाजराचा रस रोज प्यायल्याने अनेक वर्षे जुने आजार बरे होतात. शरीरातील सूज कमी करण्यासाठी देखील हे खूप फायदेशीर आहे.

तुमचे वजन वाढत असेल आणि ते कमी करायचे असेल तर रोज सकाळी गाजराचा रस प्यावा. यामुळे वजन कमी होण्यास मदत होऊ शकते.

पचनक्रिया व्यवस्थित ठेवण्यासाठी तुम्ही याचे सेवन देखील करू शकता. पोटॅशियम समृध्द इतर पदार्थांचा त्यात समावेश आहे. हे अतिसार रोखण्यासाठी खूप मदत करते.

मधुमेह असलेल्या रुग्णांनी कमी-ग्लायसेमिक निर्देशांक असलेले अन्न खाणे आवश्यक आहे. कारण ते रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यात मदत करतात. गाजराच्या रसामध्ये कमी ग्लायसेमिक इंडेक्स असतो. यामुळेच मधुमेही रुग्णांसाठी हा एक चांगला पर्याय आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vertical Property Card : महाराष्ट्रातील प्रत्येक सदनिकेला स्वतंत्र ओळख क्रमांक आणि मालकी हक्कांची सरकारी नोंद मिळणार; महसूल विभागाकडून व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्डचा मसुदा खुला

Hinjewadi Metro : हिंजवडी-वाकडमधील मेट्रो प्रवाशांचा प्रवास सुकर करण्यासाठी पीएमआरडीएचा निर्णय; २६ जोडरस्त्यांचा विकास, डिसेंबरअखेर प्रत्यक्ष कामांना सुरुवात

High Court Gift Deed Ruling : "२० वर्षांपूर्वी सुनेला बक्षीसपत्राने दिलेली मालमत्ता सासूला परत मागता येणार नाही!" उच्च न्यायालयाचा मोठा निकाल

Jalgaon Jalna Railway Line Tunnel : मराठवाडा-खानदेशचा प्रवास सुसाट होणार! जळगाव-जालना रेल्वे मार्गावर बनणार देशातील सर्वात मोठा २३.५ किमीचा बोगदा; ३३६ किमीचे अंतर येणार थेट निम्म्यावर!

Pune News : स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानाला ‘डीआयएटी’चे बळ; अत्याधुनिक लेझर आणि फोटॉनिक्स प्रणाली विकसित करणार

SCROLL FOR NEXT