लाइफस्टाइल

Tulsi Benefits : तुळशीच्या पानांचे आरोग्यदायी फायदे, सर्दी खोकल्यासह या समस्यांपासून मिळेल लवकर आराम

तुळशीची पाने रोज खाल्ल्याने कोणते फायदे मिळतात? याबाबत जाणून घेऊया.

Aishwarya Musale

भारतीय घरांमध्ये तुळशीची उपस्थिती अत्यंत शुभ मानली जाते. अनेकदा आपण चहा आणि काढा बनवण्यासाठी त्याचा वापर करतो. तुळशीचे काही फायदे तुम्हाला माहित असतीलच, पण तुळशीचे पानं खाण्याचे अनेक फायदे आयुर्वेदात सांगितले आहेत हे तुम्हाला माहीत आहे का? तुमच्या आरोग्यासाठी तुळशी किती फायदेशीर आहे हे आज आम्ही तुम्हाला सांगतो. चला जाणून घेऊया त्याचे फायदे.

ताण दूर करू शकते

तुळशीमध्ये काही गुणधर्म आहेत जे मन शांत ठेवण्यास, तणाव आणि चिंता कमी करण्यास मदत करतात. तुम्ही ते रोज खाऊ शकता. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही चहामध्ये तुळशीचे पानं घालू शकता.

प्रतिकारशक्ती वाढते

तुळशीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि अनेक पोषक घटक आढळतात, जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्याचे काम करतात. हे शरीराला संसर्ग आणि रोग दूर करण्यास देखील मदत करते.

खोकला-सर्दी

अनेकदा, जेव्हा जेव्हा एखाद्याला खोकला किंवा सर्दी होते, तेव्हा काढा बनवून त्याला दिला जातो, ज्यामध्ये तुळशीचे पानं देखील घातलस जातात. कारण हे छातीतील खोकला आणि श्लेष्मा कमी करण्यास मदत करते आणि श्वासोच्छवासाशी संबंधित समस्या दूर करण्यास देखील मदत करते.

पचन व्यवस्थित ठेवते

ज्या लोकांना पोटाशी संबंधित कोणतीही समस्या असेल तर तुळशीची पाने चावून खाऊ शकता. ॲसिडिटी कमी करणे, सूज कमी करणे यासारख्या समस्यांवर याचे सेवन फायदेशीर आहे.

बद्धकोष्ठता दूर करते

तुळशीच्या पानांचे सेवन केल्याने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होऊ शकते. उपाशी पोटी तुळशीच्या पानांचे सेवन केल्याने पचन क्रिया देखील सुधारू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT