लाइफस्टाइल

Jaggery Tea Benefits: ग्रीन टीपेक्षाही फायदेशीर आहे गुळाचा चहा; हिवाळ्यात नक्की सेवन करा

गुळाचा चहा हा आरोग्यासाठी खूपच फायदेशीर मानला जातो.

Aishwarya Musale

आपली सकाळ ही एक कप चहानेच होते. कोणी साखरेचा चहा घेतात. तर कोणी ग्रीन टी घेतं. पण, तुम्हाला माहित आहे का या दोन्ही चहांपैकी गुळाचा चहा हा आरोग्यासाठी खूपच फायदेशीर मानला जातो. तसेच या चहाची एक वेगळीच चव देखील आहे. त्यामुळे बऱ्याच जणांना गुळाचा चविष्ट चहा फार आवडतो. महत्त्वाचे म्हणजे गुळाचा चहा हा हिवाळ्यात घेणे फार फायदेशीर मानले जाते.

लोक हिवाळ्यात आले आणि वेलची घालून चहा पितात, अशा परिस्थितीत, यावेळी तुम्ही तुमच्या चहामध्ये आले, वेलची, दालचिनी आणि काळी मिरी मिसळू शकता, ज्यामुळे तुमच्या चहाची चव तर वाढेलच. पण तुमचे वजन देखील कमी होईल. सर्दी, खोकला, ताप आणि प्रतिकारशक्ती वाढवणे यासह अनेक गोष्टींसाठी ते फायदेशीर ठरेल. आज आम्‍ही तुम्‍हाला गुळाच्या चहाची एक खास रेसिपी सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.

लागणारे साहित्य

बारीक चिरलेला गूळ

चहा पावडर

वेलची

दालचिनी

काळी मिरी

एक कप पाणी

आलं

दोन कप दूध

गुळाच्या चहाची रेसिपी

गुळाचा चहा बनवण्यासाठी एका भांड्यात एक कप पाणी गरम करा.

पाणी गरम झाल्यावर त्यात चहा पावडर, आलं किंवा सुंठ, काळी मिरी, दालचिनी, वेलची आणि गूळ घालून सर्वकाही चांगले उकळेपर्यंत शिजवा.

गुळाचा चहा जास्त वेळ उकळला तर फुटतो, त्यामुळे जास्त वेळ उकळू नये.

चहा झाला की कपात गाळून बिस्किटांसोबत सर्व्ह करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari Ethanol News : ई-२० नंतर आता शंभर टक्के इथेनॉलवर धावणाऱ्या वाहनांवर भर; नितीन गडकरींची मोठी घोषणा

कीर्तनातून प्रसिद्ध झालेल्या तरुणीची भन्नाट गोष्ट; ‘पाच फुटाचा बच्चन’च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता

IND vs WI 2nd ODI : वेस्ट इंडिजने इतिहास घडवला! सर्वोच्च धावसंख्या, भारताविरुद्ध वर्ल्ड रेकॉर्ड; कॅम्बेल, होप अन् जांगूचे शतक, ४०० पार

Latest Marathi News Live Update : कर्नाटकातील 'मंगळूर रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स लिमिटेड'मध्ये अचानक भीषण आग

कसाबच्या भूमिकेत ललित प्रभाकरला पाहून येईल चीड; राजकुमार रावही जबरदस्त, 'प्रहार' चा ट्रेलर बनला चर्चेचा विषय

SCROLL FOR NEXT