लाइफस्टाइल

Health Care News : मांड्यांची चरबी कमी करण्यासाठी दररोज करा 'हे' व्यायाम, लगेच दिसेल परिणाम

मांडीची चरबी कमी करण्यासाठी दररोज करा 'हे' व्यायाम.

Aishwarya Musale

लठ्ठपणा ही एक मोठी समस्या आहे. स्त्री असो की पुरुष, प्रत्येकाला याचा त्रास होतो. लठ्ठपणामुळे फिगर खराब दिसत असली तरी त्यामुळे अनेक आजारांचा धोकाही निर्माण होतो. पोट आणि मांड्यामध्ये जमा झालेल्या चरबीमुळे लोक सर्वाधिक त्रस्त आहेत. यामुळे शरीराच्या खालच्या भागाचा आकार तर खराब होतोच, पण चालायला आणि बसण्यातही त्रास होतो. तुम्हालाही मांडीच्या चरबीचा त्रास होत असेल तर लेग प्रेस व्यायाम करावा.

हा व्यायाम जवळजवळ प्रत्येक बॉलिवूड सेलिब्रिटीच्या लिस्टमध्ये आहे. अलीकडेच रकुल प्रीत सिंहने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती 100 किलो लेग सेट करताना दिसत आहे.चला तर मग या व्यायामचे फायदे जाणून घेऊया.

लेग प्रेस व्यायाम करण्याचे फायदे

लेग प्रेस व्यायाम केल्याने शरीराचा खालचा भाग मजबूत होतो.

लेग प्रेस तुम्हाला तुमच्या पाठीवर दबाव न आणता तुमचे स्नायू टोन आणि मजबूत करण्यास मदत करते.

मांडीचे स्नायू कमी होण्यास मदत होते.

यामुळे हॅमस्ट्रिंग स्नायू देखील मजबूत होतात.

हा व्यायाम केल्याने फिजिकल स्ट्रेंथ वाढते.

लेग प्रेस केल्याने पाठदुखीची समस्या कमी होते.

पोटाचे स्नायू सक्रिय राहतात आणि त्यामुळे पोटाची चरबीही कमी होते.

लेग प्रेस करताना या चुका करू नका

जास्त आणि हेवी वेट वापरणे टाळा.

फक्त प्रशिक्षकाच्या देखरेखीखाली व्यायाम करा.

मशीनला पायाच्या बोटांनी ढकलण्याची चूक करू नका.

लेग प्रेस करताना गुडघ्यांना लॉक करू नका. यामुळे गुडघ्यांवर दबाव येतो ज्यामुळे हाडे कमकुवत होऊ शकतात.

पोहणे हा उत्तम व्यायाम

तुम्हाला स्विमिंग येत असेल तर यासारखा चांगला व्यायाम नाही. पोहण्याने संपूर्ण शरीरावर चांगला परिणाम होतो. आपले हात-पाय मजबूत होते आणि मांड्याची चरबी कमी होण्यास मदत मिळते आणि मांसपेशी अधिक मजबूत होतात. तसंच अनेक आजारही दूर राहतात आणि दम्याच्या रुग्णांसाठीही पोहण्याच्या व्यायामाचा उपयोग होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari Ethanol News : ई-२० नंतर आता शंभर टक्के इथेनॉलवर धावणाऱ्या वाहनांवर भर; नितीन गडकरींची मोठी घोषणा

कीर्तनातून प्रसिद्ध झालेल्या तरुणीची भन्नाट गोष्ट; ‘पाच फुटाचा बच्चन’च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता

IND vs WI 2nd ODI : वेस्ट इंडिजने इतिहास घडवला! सर्वोच्च धावसंख्या, भारताविरुद्ध वर्ल्ड रेकॉर्ड; कॅम्बेल, होप अन् जांगूचे शतक, ४०० पार

Latest Marathi News Live Update : कर्नाटकातील 'मंगळूर रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स लिमिटेड'मध्ये अचानक भीषण आग

कसाबच्या भूमिकेत ललित प्रभाकरला पाहून येईल चीड; राजकुमार रावही जबरदस्त, 'प्रहार' चा ट्रेलर बनला चर्चेचा विषय

SCROLL FOR NEXT