लाइफस्टाइल

Health Care News: या पोझिशनमध्ये झोपण्यामुळे मासिक पाळीच्या वेदना होतील कमी, जाणून घ्या

पीरियड्समध्ये होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी या पोझिशनमध्ये झोपा

Aishwarya Musale

स्त्रीच्या आयुष्यातील मासिक पाळी ही जरी एक महत्त्वाची शारीरिक क्रिया असली तरी त्यामुळे होणाऱ्या वेदना फारच त्रासदायक असतात. अर्थात प्रत्येकीला महिन्यातून एकदा काही दिवस हा त्रास सहन करावाच लागतो. मासिळ पाळी सुरू होताना अचानक पोटात दुखू लागतं, कंबरेतून कळा येतात, पाय जड होतात तर कधी कधी चक्कर आणि मळमळही जाणवते.

पीरियड्स दरम्यान होणाऱ्या या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी काही महिला औषधे खातात, तर काही बाजारात मिळणारे हीटिंग पॅड वापरतात. औषधांमुळे मासिक पाळीच्या दुखण्यापासून तात्पुरता आराम मिळतो, परंतु दीर्घकाळापर्यंत त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो.

म्हणूनच मासिक पाळीच्या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी काही नैसर्गिक पद्धतींचा अवलंब करणे आवश्यक आहे. या वेदनापासून मुक्त होण्याचा नैसर्गिक आणि 100 टक्के सुरक्षित मार्ग म्हणजे योग्य स्थितीत झोपणे.

होय, झोपण्याच्या योग्य स्थितीचा अवलंब केल्याने, तुम्ही केवळ मासिक पाळीच्या वेदनापासून मुक्त होऊ होत नाही, तर क्रॅम्प्स कमी करण्यास देखील मदत होते. आज मासिक पाळीत झोपण्याची पोझिशन कशी असावी याबाबत थोडक्यात सांगणार आहोत.

गुडघ्याखाली उशी घेऊन झोपा

ज्या महिलांना मासिक पाळीच्या वेळी पोटाच्या खालच्या भागात म्हणजेच ओटीपोटात असह्य वेदना होतात त्यांना गुडघ्याखाली उशी घेऊन झोपण्याचा सल्ला दिला जातो. गुडघ्याखाली उशी ठेवून झोपल्याने पाठीवर आणि पोटावरील ताण कमी होतो, ज्यामुळे मासिक पाळीच्या दुखण्यापासून आराम मिळतो.

पोटावर झोपणे

कोणत्याही परिस्थितीत पोटावर झोपणे आरोग्यासाठी चांगले मानले जात नाही, परंतु मासिक पाळीच्या दुखण्यापासून आराम मिळण्यासाठी ही स्थिती चांगली मानली जाते. मासिक पाळी दरम्यान पोटावर झोपल्याने कंबर आणि खालच्या ओटीपोटात पेटके आणि वेदनापासून आराम मिळतो. (Health)

पाठीच्या भारावर झोपा

पाठीवर झोपल्याने मासिक पाळी दरम्यान होणारे क्रॅम्प्स कमी होण्यास मदत होते. पाठीवर झोपल्याने पोटावरील दाब देखील कमी होतो, ज्यामुळे पेटके आणि वेदना कमी होण्यास मदत होते. ज्या लोकांना मासिक पाळी दरम्यान मांड्यामध्ये जास्त वेदना होतात, त्यांना विशेषतः त्यांच्या पाठीवर झोपण्याचा सल्ला दिला जातो.

हार्मोनल बदलांमुळे मासिक पाळी दरम्यान ओटीपोटात दुखणे आणि पेटके येणे सामान्य आहे. ज्या महिलांना जास्त वेदना होतात किंवा उठण्या-बसण्यास त्रास होत आहे, त्यांनी ताबडतोब त्यांच्या डॉक्टरांशी किंवा स्त्रीरोगतज्ज्ञांशी संपर्क साधावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil Shivaji Patil : गोकुळच्या रणधुमाळीत सतेज पाटील, शिवाजीराव पाटलांच्या घरी; महायुतीत नाराजीचा ‘वेध’ घेतल्याची चर्चा

Ichalkaranji Politics : इचलकरंजीचं राजकारण तापणार! प्रकाश आवाडे थेट लोकसभेच्या रिंगणात? खासदार माने गटाची वाढली धडधड, 'त्या' वक्तव्यानं वाढवलं टेन्शन

US H1B Visa: अमेरिकेचा H1B झटका! १ लाख ३ हजार डॉलर अतिरिक्त शुल्कामुळे नोकऱ्या परदेशात जाण्याची भीती

Marathi News Live Updates : ई-चलनाविरोधातील आमरण उपोषण तात्पुरते स्थगित; दोन आठवड्यांत निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा

Birth Death Registration Rules : जन्म-मृत्यू नोंदीला दोन वर्षे विलंब, तर न्यायालयाचे दार ठोठावे लागणार; केंद्राचे नवे कडक नियम लागू, गैरप्रकार रोखण्यासाठी पाऊल

SCROLL FOR NEXT