लाइफस्टाइल

Yoga for Constipation : बद्धकोष्ठतेचा त्रास दूर करण्यासाठी रोज करा ‘ही’ योगासने, जाणून घ्या

तुम्हाला माहित आहे का नियमितपणे काही योगासनं केल्याने बद्धकोष्ठता तसचं गॅसची समस्या दूर होते.

Aishwarya Musale

सकाळी उठल्या उठल्या कोणतं काम आधी करायला हवं तर ते पोट साफ करण्याचं. सकाळी एकदा पोट नीट साफ झालं की आपल्याला दिवसभर छान फ्रेश वाटतं. पण वेळच्या वेळी पोट साफ झालं नाही तर दिवसभर आळस, कंटाळा, अस्वस्थता असं काहीतरी विचित्रं होत राहतं. पोट साफ न होण्यामागे कॉन्स्टीपेशन म्हणजेच बद्धकोष्ठता हे एक महत्त्वाचे कारण असू शकते.

पोट साफ न होणं किंवा बद्धकोष्ठता तसचं गॅस यामुळे पोटासंबधीच्या इतर समस्या निर्माण होतात. यासाठीच नियमित पोट साफ होणं गरजेचं आहे. अनेकांना केवळ काही दिवस बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. तर अनेकजण असेही आहेत ज्यांना कायमच पोट साफ न होण्याच्या समस्येमुळे इतर अनेक समस्यांचाही सामना करावा लागतो.

अनेकजण पोट साफ होण्यासाठी काही औषधं तसचं अनेक घरगुती उपाय करतात. मात्र तुम्हाला माहित आहे का नियमितपणे काही योगासनं केल्याने बद्धकोष्ठता तसचं गॅसची समस्या दूर होते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही योगासनांबद्दल माहिती देणार आहोत.

हलासन

अपचन, बद्धकोष्ठता आणि पोटासंबधीच्या सर्व समस्या दूर करण्यासाठी हलासन हा एक चांगला योग प्रकार आहे. नियमित हलासन केल्याने पचनक्रिया सुधारते. तसचं वजन कमी करण्यासाठी आणि पाठीचे स्नायू मजबुत करण्यासाठी देखील हलासन उपयुक्त ठरतं.

भुजंगासन

पचनसंस्थेच्या कार्यात बिघाड झाल्याने अनेकदा पोट साफ न होण्याची समस्या उद्धवते. यासाठी भुजंगासन फायदेशीर ठरू शकतं. भुजंगासनामुळे पचनक्रिया सुधारते यामुळे पोटाचे स्नायू बळकट होण्यासही मदत होते.

भुजंगासन हे अत्यंत सोपं आसन आहे. यासाठी दोन्ही हाताचे तळवे छातीच्या बाजूला ठेवा
कंबरेतून वर उठा आणि मागे वाका. बेंबीपर्यंतचा भाग वर उचलला जाईल हे पाहा. पायाचा पूर्ण भाग जमिनीला टेकलेला राहील आणि दोन्ही पाय एकमेकांना जोडलेले राहतील याची काळजी घ्या.

वज्रासन

बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यासाठी आणि पचनक्रिया सुधारण्यासाठी वज्रासन हे एक उत्तम आसन आहे. यामुळे पोटाच्या भागामध्ये रक्तप्रवाह वाढण्यास मदत होते. वज्रासनामुळे बद्धकोष्ठता, पोटाचे विविध आजार आणि पचनाच्या समस्या दूर होण्यासाठी मदत होते.

अर्ध मत्स्येन्द्रासन

हे आसन शरीराच्या अनेक अवयवांना बळकट होण्यासाठी मदत करतं. यामुळे शरीर डिटॉक्स होण्यासाठी मदत होते. तसचं आतड्यांचं कार्य सुरळीत होतं. जर तुम्हाला अनेक दिवसांपासून बद्धकोष्ठतेची समस्या असेल तर नियमितपणे अर्ध मत्स्येन्द्रासन केल्याने नक्कीच फायदा होईल.

अशा प्रकारे योग्य आहारासोबतच जर तुम्ही नियमितपणे ही योगासनं केलीत तर तुमची बद्धकोष्ठतेची आणि गॅसची समस्या नक्कीच दूर होण्यास मदत होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Wakad Hinjewadi News : वाकड, हिंजवडीत अनधिकृत पार्किंगमुळे कोंडी; वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष; नागरिकांकडून कारवाईची मागणी!

Mutual Fund : काय आहे Active आणि Passive म्युच्युअल फंड? जाणून घ्या म्युच्युअल फंडमधील रिस्क आणि रिटर्न!

IND vs SA: शुभमन गिल टीम इंडियासोबत दुसऱ्या कसोटीसाठी प्रवास करणार की नाही? अखेर BCCI नेच दिले अपडेट

Viral News : ऑफिसमध्ये मॅनेजर बनायचा हिटलर! सुट्टी-वर्क फ्रॉम होमवर विचारायचा शंभर प्रश्न; वैतागून तरुणाने केला धक्कादायक प्रकार

Latest Marathi Breaking News Live Update : 26 तारखेच्या बैठकीत युवा स्वाभिमान पार्टीची भूमिका स्पष्ट करू - नवनीत राणा

SCROLL FOR NEXT