Black Tea sakal
लाइफस्टाइल

Black Tea Benefits: एक कप कोरा चहा पिण्याचे आश्चर्यकारक फायदे! मधुमेह अन् बरेच आजार दूर पळतील!

जगभरातील करोडो लोकांच्या दिवसाची सुरुवात चहाने होते.

Aishwarya Musale

जगभरातील करोडो लोकांच्या दिवसाची सुरुवात चहाने होते. सकाळी चहा प्यायल्यानंतर लोकांना ताजेतवाने वाटते. चहा हे सर्वात लोकप्रिय पेयांपैकी एक आहे, लोकांना त्याचे वेड आहे. चहा पिऊन लोकांना ऊर्जा मिळते. साधारणपणे लोकांना दुधासोबत चहा प्यायला आवडतो, पण ते आरोग्यासाठी फारसे फायदेशीर नसते. जेव्हा चहा साखर आणि दुधाशिवाय बनवला जातो तेव्हा त्याला ब्लॅक टी किंवा डार्क टी म्हणतात. ब्लॅक टी पिणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते.

हेल्थलाइनच्या रिपोर्टनुसार, संशोधकांनी एका नव्या संशोधनात ब्लॅक टी बाबत धक्कादायक खुलासा केला आहे. नवीन संशोधनानुसार, दररोज ब्लॅक टी पिल्याने रक्तातील साखरेची पातळी सुधारून टाइप 2 मधुमेहाचा धोका कमी होऊ शकतो. ब्लॅक टी चे नियमित सेवन केल्याने मधुमेही रुग्णांच्या रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

ऑस्ट्रेलियाच्या अॅडलेड विद्यापीठ आणि चीनच्या साउथईस्ट विद्यापीठाच्या संशोधकांनी संयुक्तपणे हे संशोधन केले आहे. या संशोधनात शास्त्रज्ञांना असे आढळून आले की, जे दररोज ब्लॅक टी पितात त्यांच्यामध्ये प्री-डायबिटीजचा धोका 53 टक्क्यांनी कमी होतो आणि टाइप 2 मधुमेहाचा धोका 47 टक्क्यांनी कमी होतो. म्हणजेच जर तुम्ही दररोज 1 कप ब्लॅक टी प्यायला तर तुम्ही मधुमेहापासून वाचू शकता.

ब्लॅक टी चे मोठे फायदे

- ब्लॅक टी प्यायल्याने शरीराची प्रतिकारशक्ती वाढते.

- रोज ब्लॅक टी प्यायल्याने हाडे मजबूत होतात.

- ब्लॅक टी पचनासाठी फायदेशीर ठरू शकतो.

- ब्लॅक टी शरीरातील अतिरिक्त चरबी काढून टाकण्यास उपयुक्त आहे.

- ब्लॅक टी त्वचेच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT