Health  sakal
लाइफस्टाइल

Health Care: प्रत्येक प्रकारच्या कॅन्सरला जबाबदार आहेत हे पदार्थ, जाणून घ्या

जर तुम्हाला कॅन्सरपासून बचाव करायचा असेल तर सर्वप्रथम तुम्ही तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयी सुधारल्या पाहिजेत.

Aishwarya Musale

आपल्या आरोग्याकडे कोविडच्या काळात लोकांनी लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. तुम्हाला माहिती आहे की तुम्ही जर हेल्दी फूड खाल तर तुम्हाला उत्साही आणि तंदुरुस्त वाटेल. पण जर तुमच्या फूड प्लेटमध्ये ट्रान्स फॅट आणि रिफाइन्ड उत्पादनांचे प्रमाण जास्त असेल तर आळस आणि आरोग्याच्या समस्या अटळ आहेत. तसेच खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे यकृत, किडनी आणि हृदयाशी संबंधित आजार होऊ शकतात. कर्करोग हा सर्वात घातक आजारांपैकी एक आहे ज्याची अनेक कारणे आहेत.

संशोधनात असे दिसून आले आहे की 80-90 टक्के घातक ट्यूमर बाह्य घटकांशी संबंधित आहेत. सर्वात महत्वाचे जीवनशैली घटकांपैकी एक म्हणजे आपला आहार. तज्ञांच्या मते, काही खाद्यपदार्थ विशिष्ट प्रकारच्या कर्करोगाच्या उच्च जोखमीशी संबंधित असतात.

बर्‍याच पदार्थांमुळे तुमचा टाइप-2 मधुमेह आणि लठ्ठपणाचा धोका वाढू शकतो, जे काही प्रकारच्या कर्करोगाशी निगडीत आहेत कारण त्यात कार्सिनोजेन असतात, जे हानिकारक पदार्थ असतात ज्यामुळे कर्करोग होऊ शकतो.

प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ

तज्ञ म्हणतात की या पदार्थांवर प्रक्रिया केल्याने कार्सिनोजेन्स तयार होतात कारण त्यात नायट्रेट्स मुबलक प्रमाणात असतात, ज्याला एन-नायट्रोसो संयुगे म्हणतात. अभ्यासानुसार, प्रक्रिया केलेले मांस प्राणघातक कोलोरेक्टल आणि पोटाचा कर्करोग होतो.

सॉफ्ट ड्रिंक्स व सोडा

अनेक प्रकारचे कर्करोग लठ्ठपणामुळे होतात, त्यामुळे निरोगी वजन राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सॉफ्ट ड्रिंक्स आणि सोडा यासारख्या गोष्टींचे नियमित सेवन केल्याने लठ्ठपणा वाढतो आणि ही समस्या भविष्यात कर्करोगाला कारणीभूत ठरते.

दारू

अल्कोहोल हे जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणार्‍या पेयांपैकी एक आहे, ज्यामुळे अनेक आरोग्य समस्या उद्भवतात.

दारू पिण्याचा अनेकजण अधूनमधून आनंद घेतच असतात. डॉक्टरही सांगतात दारुचे सेवन शक्य तितके कमी करावे. पोट, स्तन, लिव्हर, तोंड, घसा आणि अन्ननलिका इत्यादींसह अनेक प्रकारचे कर्करोग अल्कोहोलच्या सेवनाशी संबंधित आहेत. जेव्हा तुम्ही अल्कोहोलचे सेवन करता तेव्हा तुमचे लिव्हर अल्कोहोल एसीटाल्डिहाइड मध्ये मोडते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोबाईल हॅक झाल्याची भीती, फार्मसीच्या २० वर्षीय तरुणानं जीवन संपवलं; एकुलत्या एक लेकाच्या मृत्यूनं आई-वडिलांचा आक्रोश मन हेलावणारा

CA Exam Result: 'सीए परीक्षेत सांगलीतील २० जणांचे उल्‍लेखनीय यश'; गेली काही वर्षे विद्यार्थ्यांचे यशात सातत्य

Eco Friendly Bill: ‘महावितरण’च्या ‘गो ग्रीन’ योजनेचा पाच लाख ग्राहकांनी घेतला फायदा

मी पाकिस्तानी लष्कराचा विश्वासू एजंट; 26/11च्या हल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाचा मोठा खुलासा

Latest Maharashtra News Updates : पुण्यात २६ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त; पोलिसांची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT