लाइफस्टाइल

High blood pressure : उच्च रक्तदाबाच्या रूग्णांनी नारळ पाण्याचे सेवन करावे की करू नये? जाणून घ्या

उच्च रक्तदाबाच्या रूग्णांनी नारळ पाण्याचं सेवन करावं की करू नये?

Aishwarya Musale

नारळाच्या पाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. आपल्यापैकी बरेच जण नारळ पाणी दररोज पितात. काहीवेळा, लोक दिवसातून दोनदा ते पितात. नारळ पाणी प्यायल्याने आपल्या पोटातही थंडावा राहतो. हे पाणी प्यायल्याने शरीरात इलेक्ट्रोलाईट्स संतुलित राहतात.

नारळ पाणी प्यायल्याने आपले रक्ताभिसरण सुरळीत राहते. कोलेस्ट्रॉलच्या समस्येपासून मुक्त राहतो, तसेच शरीरातील शिरा साफ होतात. तसेच, ज्या लोकांना खराब कोलेस्ट्रॉलची समस्या आहे त्यांनी नारळाच्या पाण्याचं सेवन नक्की करावं.

नारळाचं पाणी शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्याचे काम करतात. परंतु उच्च रक्तदाबासारख्या काही आजारांमध्ये नारळ पाणी प्यावे की नाही, याबाबत अनेक प्रश्न मनात राहतात.

उच्च रक्तदाब असल्यास नारळ पाणी प्यावे की नाही?

उच्च रक्तदाबाच्या रुग्णांना नारळाचे पाणी प्यायल्याने फायदा होत असला, तरी ते सेवन करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांशी बोला आणि त्यांनी सांगितलेल्या प्रमाणातच नारळाचे पाणी प्या.

नारळाचे पाणी प्यावे कारण त्यात पोटॅशियमचे प्रमाण चांगले असते. यामुळे शरीरातील पोटॅशियमची कमतरता भरून काढता येते.

नारळ पाणी प्यायल्याने शरीरात जमा झालेले अतिरिक्त लोह आणि सोडियम लघवीच्या मदतीने बाहेर पडतात. यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो.

अशक्तपणा दूर करण्यासाठीही तुम्ही याचे सेवन करू शकता. यामुळे तुम्हाला त्वरित ऊर्जा मिळते. हे रक्ताभिसरण सुधारते.

ज्यांचा रक्तदाब खूप कमी आहे त्यांनी नारळ पाणी पिऊ नये. बीपीच्या रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच याचे सेवन करावे. त्याच वेळी, जर तुमची शस्त्रक्रिया होणार असेल किंवा झाली असेल तर हे पाणी पिऊ नका.

किती प्रमाणात पाणी प्यावे? 

रक्तदाब वाढल्यास एक ग्लास नारळ पाणी पिणे चांगले मानले जाते. तज्ज्ञांच्या मते, आठवड्यातून 2 ते 3 दिवस नारळ पाणी पिणं शरीरासाठी चांगलं आहे. नारळ पाणी सकाळी रिकाम्या पोटी पिणे आणखी फायदेशीर ठरू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI Repo Rate: कर्जदारांना मोठा धक्का? ऑक्टोबर-डिसेंबरमध्ये रेपो रेट वाढण्याची शक्यता; EMI किती वाढणार?

CM विजय यांनी नवजात बाळांना दिली सोन्याची अंगठी; भाजपने टीका करत म्हटलं, मुलांना दुधाची जास्त गरज

Thane News: ठाण्यात शिंदेंच्या कार्यकर्त्याला महिलांनी धु-धू धुतला, पोलिसांसमोर घडला प्रकार; व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : ‘सीओईपी’च्या चिखली कॅम्पसमध्ये उभाणार ‘स्वदेशी बॅटरी तंत्रज्ञान केंद्र’

Heart Attack Prevention : वयाच्या तिशीतच का येतोय हार्ट अटॅक? तरुणांमध्ये वाढतोय हृदयविकाराचा धोका; 'या' सवयी तातडीने बदला नाहीतर...

SCROLL FOR NEXT