लाइफस्टाइल

Weight Loss Mistakes : व्यायाम करूनही वजन कमी होत नाही; तुम्ही या चुका तर करत नाहीत ना?

व्यायाम करूनही वजन कमी होत नाही? तुम्हीसुद्धा या चुका करत आहात का?

Aishwarya Musale

निरोगी राहण्यासाठी वजनाकडे लक्ष देणे खूप गरजेचे आहे. अनेकदा लोक त्यांच्या वाढत्या वजनाकडे लक्ष देत नाहीत, पण जेव्हा त्याचा त्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ लागतो तेव्हा ते वजन कमी करण्याचा प्रयत्न करू लागतात. लठ्ठपणा ही एक मोठी समस्या आहे. याचा परिणाम तुमच्या संपूर्ण आरोग्यावर होतो.

अर्थात तुमचे वजन वाढत असेल तर ते कमी करणे गरजेचे आहे. मात्र यासाठी घाई न करता आरोग्यदायी सवयींवर भर द्यावा. अनेकदा लोकांना वजन कमी करण्याची घाई असते आणि त्यामुळे त्यांच्याकडून अनेक चुका होतात, ज्यामुळे वजन कमी होण्याऐवजी वाढू लागते.

विशेषत: महिला वजन कमी करण्यासाठी अनेक चुका करतात, ज्यामुळे हार्मोनल बॅलेन्ससह अनेक गोष्टींवर परिणाम होतो. वजन कमी करताना कोणत्या चुका टाळाव्यात? याबद्दल जाणून घेऊया.

जेवण वगळणे

आपण जे काही खातो त्याचा थेट परिणाम आपल्या वजनावर होतो. वजन कमी करण्यासाठी अनेकदा लोक जेवण वगळतात. पण प्रत्यक्षात यामुळे वजन कमी होत नाही, उलट त्यामुळे चयापचय मंदावतो. तसेच, जेव्हा तुम्ही दीर्घकाळानंतर काहीही खाता तेव्हा तुम्ही जास्त खाता आणि वजन कमी होण्याऐवजी वाढू लागते.

तज्ज्ञांच्या मते, वजन कमी करण्यासाठी अशा अनेक आहाराची शिफारस केली जाते, ज्यामध्ये कर्बोदकांचा समावेश नाही. परंतु बहुतेक उच्च-कार्ब पदार्थांमध्ये देखील उच्च फायबर असते. आपल्या पचनसंस्थेचे योग्य कार्य करण्यासाठी फायबर खूप महत्वाचे आहे. म्हणून, आपल्या आहारात उच्च फायबर आणि प्रोसेस्ड फूड्स जसे की फळे, भाज्या आणि संपूर्ण धान्य समाविष्ट करा.

प्रोटीन

वजन कमी करताना प्रोटीन रीच डाएटवर लक्ष केंद्रित करा. तुम्ही व्यायाम करत असाल तरच तुमच्यासाठी प्रथिने आवश्यक आहेत असे अनेकदा लोकांना वाटते. पण प्रत्यक्षात तसे नाही. प्रथिने शरीराला ऊर्जा देते, चयापचय सुधारते आणि स्नायूंसाठी देखील महत्वाचे आहे. हे वजन कमी करण्यास देखील मदत करते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

B.Arch Admission Round 3 : बी. आर्किटेक्चर प्रवेश प्रक्रियेची तिसरी यादी जाहीर; ७५८ विद्यार्थ्यांना नवी संधी, ५३६ जणांचे ऑटो फ्रिज प्रवेश निश्चित

विदर्भासह मध्य भारतात पावसाचा अलर्ट; अतिमुसळधार पावसाचा इशारा

Sakal Impact | MPSC Drug Inspector Exam Scam: एमपीएससी औषध निरीक्षक भरतीत पेपरफुटीला दुजोरा; संपूर्ण प्रक्रिया रद्द, शुल्काविना फेरपरीक्षा जाहीर

Nepal Flood: नेपाळमध्ये पावसाविना पूर! २९१ विदेशी नागरिक बेपत्ता; १०५ भारतीयांचा समावेश, १६ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT