Children sakal
लाइफस्टाइल

Dengue Fever in Children: लहान मुलांमध्ये डेंग्यूची झपाट्याने वाढ, या लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष

दरवर्षी देशभरात डेंग्यूच्या झपाट्याने वाढणाऱ्या रुग्णांची नोंद होत आहे.

Aishwarya Musale

दरवर्षी देशभरात डेंग्यूच्या झपाट्याने वाढणाऱ्या रुग्णांची नोंद होत आहे. यंदाही डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याने रुग्णालयांमध्ये मोठी गर्दी दिसून येत आहे.

डेंग्यू रोखण्यासाठी सर्व राज्य सरकारे विविध पावले उचलत आहेत. बेंगळुरूमध्ये डेंग्यूचे ४ हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. त्याचवेळी राजधानी दिल्लीसह उत्तराखंड, यूपी, बिहार, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये डेंग्यूच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे.

लहान मुलांमध्येही डेंग्यूचा हा संसर्ग झपाट्याने पसरत आहे, त्यामुळे लोकांची चिंता वाढली आहे. आरोग्य विभागाने अद्याप याबाबत कोणतीही माहिती दिली नसली तरी, आतापर्यंत डेंग्यूच्या संसर्गामुळे रुग्णालयात दाखल झालेल्या सर्व बालकांचे बॉडी टेंपरेचर 103° आणि 104° असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

मुलांमध्ये डेंग्यूची लक्षणे

  • जास्त उलट्या होणे

  • शरीरावर पुरळ उठणे

  • नाक आणि हिरड्यांमधून थोडासा रक्तस्त्राव

  • तीव्र डोकेदुखी

५ दिवसानंतरही बाळाचा ताप कमी होत नसेल तर त्याला रुग्णालयात दाखल करावे, असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. डेंग्यूने त्रस्त मुलांच्या यकृतातील एन्झाईम्सची पातळीही खूप जास्त असल्याचे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे, त्यामुळे पालकांनी त्यांना हायड्रेट ठेवण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे.

डेंग्यूपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे

  • घराभोवती पाणी साचू देऊ नका

  • मुलांना फुल स्लीव्हचे कपडे घाला.

  • पाण्याची भांडी आणि टाक्या बंद ठेवा.

  • घरामध्ये कीटकनाशकांची फवारणी करावी.

  • मुलांची बाहेर जाण्याची वेळ मर्यादित करा. मुलांना संध्याकाळी आणि सकाळी घराबाहेर पडू देऊ नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

Igatpuri Tunnel Latest Update : समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट! इगतपुरी बोगदा 'या' वेळेत बंद राहणार, काय आहे कारण?

Marathi News Live Updates : सुशिक्षित पूर्वज असल्याने आदिवासी दावा नाकारता येणार नाही, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

September 1 Rule Changes 2026 : सप्टेंबर १ तारखेपासून बदलणार ५ महत्त्वाचे नियम; सामान्यांच्या खिशावर परिणाम, LPG सिलिंडरपासून कारच्या किमतीपर्यंत मोठे बदल

SCROLL FOR NEXT