health  sakal
लाइफस्टाइल

Fasting Tips: दिवसभराचा उपवास सोडताना 'हे' पदार्थ खाण्याची चूक करु नका; आरोग्याचं होईल नुकसान

उपवास करत असताना काया खावे काय नाही याबाबत अनेक नियम आहेत.

Aishwarya Musale

उपवासाला धार्मिक महत्त्व तर आहेच पण लोक फॅट टू फिट होण्यासाठीही उपवास करतात. यातून आरोग्याला खूप फायदा होतो. शरीर डिटॉक्स होते, पचनसंस्थेसाठीही फायदेशीर असते. पण काही लोक दिवसभर उपवास केल्यानंतर संध्याकाळी उपवास सोडतात तेव्हा अशा काही गोष्टी खातात ज्यामुळे फायद्याऐवजी नुकसान होऊ शकते. उपवास सोडताना काय खावे आणि काय खाऊ नये हे जाणून जाणून घेऊया.

उपवास सोडल्यानंतर कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत?

मसालेदार अन्न खाणे टाळा

जर तुम्ही दिवसभर काहीही खाल्ले नसेल तर उपवास सोडल्यानंतर तुम्हाला खूप भूक लागेल आणि काहीतरी चांगले खावेसे वाटेल. अशा परिस्थितीत काही लोक उपवास सोडल्यानंतर मसालेदार पदार्थ खातात. पण अचानक शरीराला तेलकट आणि मसालेदार अन्न पचवता येत नाही. त्यामुळे पोटदुखी आणि गॅसचा त्रास होतो.

आंबट फळे खाऊ नका

उपवास सोडताना आंबट फळे खाणे टाळावे, त्यामुळे अॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो. लिंबू, संत्री आणि मोसंबी यासारखी आंबट फळे रिकाम्या पोटी खाल्ल्याने पोटात जळजळ होऊ शकते. त्याऐवजी तुम्ही टरबूज, काकडी, सफरचंद आणि पेरूचे सेवन करू शकता.

कॉफी आणि चहा पिणे टाळा

अनेकदा उपवास सोडल्यानंतर लोकांना चहा-कॉफीची तल्लफ जाणवते. काही लोक तहान भागवण्यासाठी कोल्ड्रिंकही पितात. तुम्हीही या गोष्टींपासून दूर राहा कारण अचानक रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफी प्यायल्याने तुमच्या आरोग्यावर मोठा परिणाम होऊ शकतो. त्याऐवजी तुम्ही ताज्या फळांचा रस, ताक किंवा थंड दूध पिऊ शकता.

कचोरी आणि मिठाई

उपवास सोडल्यानंतर, भजी, तेलात बनवलेल्या कचोरी, हलवा आणि मिठाई यासारखे अन्न पूर्णपणे टाळावे. यामुळे सूज येण्याची समस्या उद्भवू शकते. तुम्हाला डोकेदुखीची समस्या देखील असू शकते.

कारण तुम्ही दिवसभर उपवास करत असता आणि अचानक जड अन्न खाल्ल्याने असे अन्न पचायला जास्त वेळ लागतो ज्यामुळे चिडचिड होऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT