Health sakal
लाइफस्टाइल

Health Care News: मिक्स फ्रूटमध्ये केळी मिक्स करताय? असं केल्याने होईल त्रास, जाणून घ्या तज्ञ काय म्हणतात

चुकूनही केळी कोणत्याही मिक्स्ड फ्रूट स्मूदीमध्ये मिसळू नका.

Aishwarya Musale

काही लोकांना बनाना शेकचे वेड असते. पण तुम्ही बनाना शेक इतर कोणत्याही फ्रूट स्मूदीमध्ये मिसळून प्यायल्यास त्यातून फ्लॅव्हनॉल कंपाऊंड निघून जाईल. म्हणजे त्यातून पोषक तत्वे नष्ट होतील आणि फायदा होणार नाही. त्यामुळे चुकूनही केळी कोणत्याही मिक्स्ड फ्रूट स्मूदीमध्ये मिसळू नका. फ्लॅव्हनॉल हे एक कंपाउड आहे जे मेंदूचे तंतू सक्रिय करते आणि ते निरोगी बनवते. याशिवाय फ्लेवनॉल शरीरासाठी खूप फायदेशीर आहे.

आता एका नवीन संशोधनात असे आढळून आले आहे की स्मूदीमध्ये केळी मिक्स केल्यास त्यातील फ्लेव्हनॉलची पातळी लक्षणीयरीत्या कमी होते. अभ्यासादरम्यान, असे आढळून आले की फ्लॅव्हनॉल पॉलिफेनॉल ऑक्सिडेसच्या विविध स्तरांवर परिणाम करते. फ्लॅव्हनॉल हे विविध खाद्यपदार्थ आणि पेयांमध्ये आढळणारे एक नैसर्गिक कंपाउड आहे जे बौद्धिक क्षमता आणि हृदयाच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे.

पीच, ब्लॅकबेरी, ब्लूबेरी, द्राक्षे, सफरचंद इत्यादींपासून बनवलेल्या स्मूदीमध्ये फ्लेव्हॅनॉलचे प्रमाण जास्त असते. पण त्यात केळी घातल्यास फ्लेव्हनॉलची पातळी लक्षणीयरीत्या कमी होईल. संशोधनानुसार, “सामान्य अन्न आणि केळी आणि मिक्स फ्रूटपासून बनवलेले स्मूदी खाल्ल्यानंतर फ्लॅव्हनॉलच्या पातळीवर याचा कसा परिणाम होतो हे आम्ही अतिशय व्यावहारिक पातळीवर समजून घेण्याचा प्रयत्न केला.

म्हणून संशोधकांनी पॉलीफेनॉल ऑक्सिडेसच्या उच्च क्रियाकलापांसह प्रयोग केले. यासाठी प्रयोगात सहभागी लोकांना केळीपासून बनवलेले मिक्स स्मूदी देण्यात आले. दुसरीकडे, काही लोकांना फ्लॅव्हनॉल कॅप्सूल देण्यात आले.

कॉम्बिनेशनची काळजी घेणे महत्वाचे आहे

अभ्यासात असा निष्कर्ष काढण्यात आला आहे की, ज्यांनी केळी मिसळून स्मूदी घेतली त्यांच्यामध्ये फ्लॅव्हॅनॉलचे प्रमाण नियंत्रण गटातील लोकांपेक्षा 84 टक्के कमी होते. तज्ञांनी केलेल्या रिसर्चनुसार, जेव्हा आपण स्मूदीजमध्ये केळीचा समावेश करतो तेव्हा ते फ्लेव्हनॉलची पातळी झपाट्याने कमी करते.

त्यामुळे शरीरात फारच कमी फ्लेवनॉल पोहोचते. यावरून असे दिसून आले की स्मूदी बनवताना विविध प्रकारची फळे मिसळण्यापूर्वी, त्यांच्या मिश्रणाचा विचार करणे आवश्यक आहे. अकादमी ऑफ न्यूट्रिशनिस्ट अँड डायटेटिक्सच्या मते, प्रत्येक व्यक्तीला दररोज 400 ते 600 मिलीग्राम फ्लॅव्हॅनॉलची आवश्यकता असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance : आरोग्य विम्यावर ‘जीएसटी’चा भार; सर्वसामान्यांचे बिघडतेय आर्थिक गणित

Maharashtra Rain Update : महाराष्ट्रावर अतिमुसळधार पावसाचे संकट, पुढील 24 तास महत्वाचे; हवामान विभागाचा हाय अलर्ट

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : महाराष्ट्रापुढील सर्व संकटे दूर करण्याची शक्ती पांडुरंगाने द्यावी- देवेंद्र फडणवीस

Beed News: परळीतील गोळीबार खून प्रकरणात न्यायालयाचा मोठा निर्णय ,आरोपींना मिळणार नाही जामीन!

Ashadhi Ekadashi 2025 Special Recipe: आषाढी एकादशीनिमित्त उपवासाला बनवा खास अन् स्वादिष्ट पॅटिस, सोपी आहे रेसिपी

SCROLL FOR NEXT