sleepy  sakal
लाइफस्टाइल

Health Care News: तुम्हाला खूप झोप येते का? तुमचं शरीर देतंय गंभीर आजाराचं संकेत

कमी झोपेप्रमाणे अति झोपही एक समस्या आहे, मात्र त्याकडे दुर्लक्ष केलं जातं.

Aishwarya Musale

रोगमुक्त जीवन जगण्यासाठी, डॉक्टर 7 ते 8 तासांची झोप घेण्याची शिफारस करतात. पण असे काही लोक असतात ज्यांना सतत झोप येते, सकाळी उठल्यावर त्यांना फ्रेश वाटत नाही, त्यामुळे हे सामान्य नाही. त्यामुळे कामावर परिणाम तर होतोच पण आरोग्यासाठीही ते चांगले नाही. तुमच्यासोबतही असे काही घडले तर त्यामागे अनेक कारणे असू शकतात. ती कारणे कोणती आहेत ते जाणून घेऊया.

जास्त झोपेचे कारण काय असू शकते?

  • तुम्ही कोणतेही न्यूरो संबंधित औषध घेत असाल तरीही, त्याच्या दुष्परिणामांमुळे तुम्हाला दिवसभर झोप येऊ शकते.

  • जर तुम्हाला अल्कोहोल किंवा कोणत्याही प्रकारच्या ड्रगचे व्यसन असेल तर तुम्हाला हँगओव्हरमुळे झोप येत राहते.

  • स्लीप एपनिया हा एक प्रकारचा स्लीपिंग डिसऑर्डर आहे. ज्यामुळे झोपेवर परिणाम होतो ज्यामुळे तुम्हाला दुसऱ्या दिवशी झोप येऊ शकते.

  • बटाटे, ब्रेड, पास्ता असे काही पदार्थ आहेत, हे सर्व उच्च ग्लुकोज पातळी असलेले पदार्थ आहेत, जे खाल्ल्याने रक्तातील साखर वाढते. त्यामुळे पेशींमध्ये ऊर्जा कमी पोहोचते आणि खाल्ल्यानंतर झोप येते.

  • नैराश्य आणि चिंतेमुळे, लोक रात्री नीट झोपू शकत नाहीत, म्हणून त्यांना दिवसभर झोप येते.

  • हायपोथायरॉईडीझमचा त्रास असलेल्या लोकांना झोपल्यानंतर थकवा जाणवतो आणि दिवसभरात आवश्यकतेपेक्षा जास्त झोप येते.

अशा प्रकारे समस्या दूर करा

तुमचा स्लीपिंग पॅटर्न दुरुस्त करा. झोपण्यापूर्वी कोणत्याही इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सपासून दूर राहणे महत्त्वाचे आहे.

पौष्टिकतेने युक्त पदार्थांचे सेवन करा. आपल्या आहारात जीवनसत्त्वे, प्रथिने आणि कार्बोहायड्रेट्सचे संतुलन राखा. कॅफिन आणि प्रोसेस्ड फूड खाणे टाळा.

हायड्रेटेड राहिल्याने आळस दूर होतो.  डिहाइड्रेशनमुळे तुमची ऊर्जा पातळी कमी होऊ शकते.

तुमच्या रूटीनमध्ये व्यायाम आणि ध्यानाचा समावेश करा, यामुळे रक्ताभिसरण सुधारते, ध्यान केल्याने मन शांत होते, चिंता दूर होते आणि रात्री चांगली झोप येण्यास मदत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वडिलांच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कारच केले नाहीत; मृतदेह प्रिझर्व्ह करून ठेवला, मुंबईतील खळबळजनक घटना

Malvan Accident : दुचाकीच्या धडकेत भाजप नगरसेविकेसह चौघे जखमी, सरकारी दवाखान्यात एक्स रे मशीन बंद असल्याने संताप

LPG Cylinder Price: उद्यापासून गॅस सिलेंडर महागणार? महाराष्ट्रात आज कितीला मिळतो LPG, पाहा शहरनिहाय दर

Pradip Purnekar case: ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याच्या हत्येचा CCTV फुटेज समोर, ७ गोळ्या झाडल्याचा आवाज

Ayush Thite Organ Donation : सोलापूरच्या आयुषच्या हृदयाने रशियातील तीन वर्षांच्या चिमुकल्याला मिळणार नवजीवन; अवयवदानाने वाचणार चौघांचे प्राण

SCROLL FOR NEXT