लाइफस्टाइल

Arm Fat : दंडावरची चरबी जास्तच लटकतेय? रोज फक्त 10 मिनिटे हे व्यायाम करा

या एक्सरसाइज कमी करतील तुमच्या दंडावरची चरबी...

Aishwarya Musale

आजकाल प्रत्येकाला तंदुरुस्त राहायचे असते. प्रत्येकाच्या फिटनेसबद्दल वेगवेगळ्या कल्पना आहेत, काही शारीरिक तंदुरुस्तीला प्रोत्साहन देतात, तर काही मानसिक तंदुरुस्तीवर लक्ष केंद्रित करतात. परंतु बहुतेकांना असे वाटते की ते शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असावेत आणि चांगले दिसावेत. काहींना त्यांचे पाय टोन करायचे असतात आणि काहींना हातावर जास्त चरबी असते.

जर तुम्ही देखील अशा लोकांपैकी आहात ज्यांना दंडावरची चरबी कमी किंवा टोन करायची आहे, तर तुम्हाला जिममध्ये जाण्याची गरज नाही कारण आम्ही तुम्हाला असे दोन व्यायाम सांगत आहोत, ज्याच्या मदतीने चरबी कमी करणे सोपे होईल. तुम्हाला दररोज तुमच्या शेड्यूलमधून फक्त 10 मिनिटे काढावी लागतील.

दंडावरची चरबी कशी कमी करावी?

आपल्या हातांची चरबी कमी करण्यासाठी तुम्हाला खाण्यावर बंदी घालण्याची गरज नाही. उलट काही प्रभावी व्यायाम नियमितपणे केल्याने ही समस्या दूर होण्यास मदत होईल. हे व्यायाम तुम्ही घरीही सहज करू शकता.

बायसेप्स व्यायाम करा

हा सामान्य बायसेप्सचा मॉडिफाइड फॉर्म आहे. हे करणे देखील सोपे आहे. तुम्हाला हा व्यायाम खूप आवडेल.

कसे करायचे?

बायसेप कर्ल करण्यासाठी, प्रथम प्रत्येक हातात एक डंबेल घ्या आणि हात सरळ ठेवा.

आता डंबेल धरत असतानाच तुमचे हात वर करा.

सुरुवातीला 10-12 वेळा करू शकता, हळूहळू संख्या वाढवा.

आर्म सर्कल व्यायाम करा

या व्यायामाने तुमच्या हातातील फ्लॅब निघून जातील. जर तुम्हाला अंडरआर्म्सजवळ असलेल्या चरबीमुळे त्रास होत असेल तर, या व्यायामामुळे ते देखील कमी होईल.

कसे करायचे?

सर्वप्रथम तुम्ही सरळ उभे रहा. आता आपले हात 180 अंश पसरवा.

हळू हळू सर्कलमध्ये हात फिरवा.

आपले हात पूर्ण 360 अंश फिरवा.

यामुळे तुमच्या हातातील चरबी झपाट्याने कमी होईल.

दोरीच्या उड्या

दोरीच्या उड्या मारून देखील आपण हाताची चरबी कमी करू शकता. दोरी उड्या मारल्याने आपल्याला घाम येतो आणि वजन देखील कमी होते. हे करताना हात गोलाकार फिरतात या मुळे त्यांचा चांगला व्यायाम होतो. तसेच अतिरिक्त चरबी देखील दररोजच्या सरावाने कमी होऊ लागते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Online Classes Appeal: ''शाळांनी ऑनलाईन क्लासेस घ्यावेत'', पंतप्रधान मोदींचं आवाहन

PBKS vs DC Live: प्रियांश आर्यचा पहिल्याच चेंडूवर कल्ला... स्टार्कला हाणला Six! नोंदवला भारी विक्रम, अक्षर पटेल स्तब्ध... Video Viral

New Railway Route : रेल्वेगाड्यांचा वेग वाढणार! कसारा-मनमाड नव्या रेल्वेमार्गिकेसाठी सर्वेक्षण

रासायनिक भेसळीवर राज्य सरकारचा दणका, दोषी व्यापाऱ्यांचे परवाने रद्द होणार

PBKS vs DC Live: दिल्ली कॅपिटल्सने प्लेइंग इलेव्हनमध्ये ५ बदल केले, पण Prithvi Shaw ला नाही खेळवले; पंजाब किंग्सच्या ताफ्यातही बदल

SCROLL FOR NEXT